ajit pawar ncp mla news solapur sanjay shinde babanrao shinde maharashtra politics Sakal
महाराष्ट्र बातम्या

NCP Spilt News: 'त्या' दोन आमदारांचा कल कोणाकडे, 'दादा' का 'साहेब'? भूमिका अद्याप गुलदस्तात

मोहोळचे राष्ट्रवादीचे आमदार यशवंत माने यांची भूमिका मात्र गुलदस्तात

सकाळ वृत्तसेवा

NCP Spilt News : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यानंतर सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात प्रचंड गदारोळ माजला आहे. यामध्ये माढ्याचे राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदे, करमाळ्याचे राष्ट्रवादी पुरस्कृत आमदार संजय शिंदे यांचा कल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बाजूने दिसत आहे.

मोहोळचे राष्ट्रवादीचे आमदार यशवंत माने यांची भूमिका मात्र अद्याप गुलदस्तात आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकार बरखास्त झाल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, तत्कालीन विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार रोहित पवार यांनी सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसची नव्याने बांधणी सुरू केली होती.

पंढरपुरातील विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला होता.नव्या समीकरणांमुळे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रचंड संभ्रम निर्माण झाला आहे.

जिल्ह्यातील कोणता नेता कोणाबरोबर आहे, याचे कोडे सर्वांना पडले आहे. सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात २००७ पासूनच शरद पवार व अजित पवार असे दोन स्वतंत्र गट कार्यरत होते. अजित पवार यांचा गट या निमित्ताने पूर्णतः वेगळा झाला आहे.

त्यामुळे आता सोलापूर जिल्ह्यातील शरद पवार गटाची नव्याने बांधणी करावी लागणार आहे. अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभाग घेतल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शिंदे-फडणवीस-पवार सरकारच्या आमदारांची संख्या वाढली आहे. जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघांपैकी सोलापूर शहर मध्यच्या काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे या विरोधी पक्षाच्या एकमेव आमदार जिल्ह्यात राहिल्या आहेत.

मंत्रिपदाची उत्सुकता वाढली

राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना सोलापूर जिल्ह्याला मंत्रिपदापासून वंचित राहावे लागले होते. राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदे, यशवंत माने, तत्कालीन आमदार भारत भालके, राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष आमदार संजय शिंदे,

काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे, शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील यापैकी एकालाही मंत्रिपदाची संधी मिळाली नाही. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर परत जिल्ह्याला मंत्रिपदापासून वंचित राहावे लागले.

जिल्ह्यात भाजपची विजयकुमार देशमुख, सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, रणजितसिंह मोहिते-पाटील, राम सातपुते, समाधान आवताडे, शिंदे गटाचे शहाजी पाटील, भाजप पुरस्कृत अपक्ष आमदार राजेंद्र राऊत एवढी फौज असताना एकालाही मंत्रिपद मिळाले नाही.

या फौजेमध्ये आता राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदे व करमाळ्याचे आमदार संजय शिंदे यांचाही समावेश झाला आहे. त्यामुळे आता या नव्या समीकरणांमध्ये जिल्ह्याला मंत्रिपद मिळणार का? याबद्दल कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.

उमेश पाटलांची भूमिका उघड

सोलापूर जिल्हा राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष उमेश पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव संतोष पवार, सोलापूर शहर राष्ट्रवादीचे युवकाध्यक्ष जुबेर बागवान या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी उघडपणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची साथ देणे पसंत केले आहे. आगामी काळात सोलापूर जिल्ह्यातील राजकारण्यांचे पत्ते कसे व कधी ओपन होणार, यावर भविष्यातील बऱ्याच घडामोडी अवलंबून आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: कसबा विधानसभा मतदारसंघात रवींद्र धंगेकर पहिल्या फेरीत आघाडीवर

Kolhapur Crime : निकालाच्या दिवशी कोल्हापुरात गोळीबाराची घटना, काय घडलं नेमकं?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting:ठाणे पाचपाखाडीमधुन एकनाथ शिंदे आघाडीवरच

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

SCROLL FOR NEXT