Devendra Fadnavis Sakal
महाराष्ट्र बातम्या

Devendra Fadnavis: "अविवाहित राहणं पसंत करेल पण राष्ट्रवादीसोबत..."; देवेंद्र फडणवीसांचा तो व्हिडीओ व्हायरल

Sandip Kapde

Devendra Fadnavis: महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा शिंदे यांनी केलेल्या बंडाची दृश्याची पुनरावृत्ती झाली आहे. गेल्या वर्षी जूनमध्ये एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या समर्थक आमदारांसह उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेविरोधात बंड केले. त्यानंतर महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार पडले.

भाजपसोबत मिळून एकनाथ शिंद यांनी त्यांच्या समर्थक आमदारांसह नवीन सरकार स्थापन केले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून निवडणूक चिन्ह हिसकावून घेतले. आता वर्षभरानंतर पुन्हा त्याच दृश्याची पुनरावृत्ती अजित पवारांनी राष्ट्रवादीसोबत केली आहे. अजित पवारांनी त्यांच्या समर्थक आमदारांसह शरद पवार यांच्या विरोधात बंड केले आणि शिंदे सरकारमध्ये सामील झाले.

अजित पवार यांनी राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावर देखील दावा केला आहे. एकनाथ शिंदे सरकारमध्ये सामील झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि निवडणूक चिन्हावर दावा केला आहे. 40 हून अधिक आमदार आपल्या समर्थनार्थ असल्याचा दावा त्यांनी केला आहे. अजित पवार यांचे बंडामागे भाजपमधील चाणक्य देवेंद्र फडणवीस यांचा हात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. (Ajit Pawar NCP News)

दरम्यान देवेंद्र फडणवीस यांचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे. फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँगेससोबत कधीही युती करणार नसल्याचे सांगितले होते.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

"राष्ट्रवादी काँग्रेससोबत भाजपची युती होण शक्य नाही. नाही, नाही..नाही..नाही. आपत धर्म नाही, श्वासत धर्म नाही. एक वेळ रिकामे राहू, एकवेळ सत्तेशिवाय राहू. मला कुणीतरी विचारल तुमचा विवाह होणार आहे का? मी सांगितलं अविवाहीत राहणं पसंत करेल पण राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाणार नाही."

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: 1 जागा अन् तिन्ही पक्षांना लढवायची असेल तर..? शरद पवारांनी सांगितली रणनीती, अंतिम उमेदवारांची घोषणा कधी?

Anganwadi Workers: शिंदे सरकारची नुसतीच घोषणा, अंमलबजावणी नाही; अंगणवाडी सेविका पुन्हा आझाद मैदानावर

CM Eknath Shinde Government: "शिंदे सरकार हिंदुत्ववादी, तरीही अल्पसंख्याकांना..." अब्दुल सत्तार हज हाऊसमध्ये नेमकं काय म्हणाले?

Gold-Silver Price Today : सोने चांदीच्या दरात झाली मोठी वाढ,सोने ७५ हजाराकडे, चांदी ९० हजार रुपयांवर

Ladli Behna Scheme: या महिलांना मिळणार नाही 'लाडली बहना'चा लाभ; सरकारचे नवे नियम अनेकांना देणार धक्का

SCROLL FOR NEXT