Ajit Pawar NCP Sakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar NCP: विरोधी पक्षनेते ते थेट उपमुख्यमंत्री! आमदारांची बैठक अन् राजकारणातील थराराचा 'तो' एक तास

अजित पवार तासाभरात विरोधी पक्षनेते ते उपमुख्यमंत्री झाले.

राहुल शेळके

Ajit Pawar NCP News: रविवारी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी राजकीय खळबळ उडाली आहे. अजित पवार तासाभरात विरोधी पक्षनेते ते उपमुख्यमंत्री झाले.

रविवारच्या राजकीय घडामोडी इतक्या झपाट्याने बदलत आहेत की कुणालाही त्याचा सुगावा लागला नाही. बैठकीनंतर अजित पवार समर्थक आमदारांसह राजभवनात पोहोचले आणि त्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

त्यांच्याशिवाय राष्ट्रवादीच्या नऊ आमदारांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली, त्यात धर्मराव अत्राम, सुनील वलसाडे, आदिती तटकरे, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, अनिल पाटील, दिलीप वळसे पाटील यांचा समावेश आहे.

यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व मंत्री राजभवनात उपस्थित होते. याशिवाय राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल हेही राजभवनात उपस्थित होचे ते शरद पवार यांचे निकटवर्तीय आहेत.

तासाभरात संपूर्ण राजकीय चित्र बदलले

रविवारी महाराष्ट्राच्या राजकारणात सर्व काही इतक्या वेगाने घडले की अजित पवार त्यांच्या समर्थक आमदारांसह राजभवनाकडे रवाना झाले तेव्हा लोकांना त्याची झलक पाहायला मिळाली.

सर्वप्रथम अजित पवार यांनी समर्थक आमदारांची त्यांच्या निवासस्थानी बैठक घेतली. यानंतर ते 17 आमदारांसह शिंदे सरकारला पाठिंबा देण्यासाठी राजभवनाकडे रवाना झाले.

पवारांच्या आगमनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही राजभवनात पोहोचले, त्यांच्यासोबत सर्व मंत्रीही उपस्थित होते.

आता पुतण्याच्या बंडखोरीनंतर आता शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस फुटण्याच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. शरद पवार पुढे कोणते पाऊल उचलतात हे पाहावे लागेल. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी काम करण्याची संधी न मिळाल्याने अजित असमाधानी असल्याचे बोलले जात आहे.

या बैठकीला पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळेही उपस्थित होते. मात्र, सुप्रिया सुळे सभेतून निघून गेल्या. रविवारी सकाळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शरद पवार यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली.

राजकीय घडामोडींवर लक्ष ठेवून शरद पवार यांनी पुण्यातच थांबण्याचा निर्णय घेतला असून त्यांचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द केल्याचे सांगण्यात येत आहे.

बैठक बोलावण्याचा अधिकार अजित पवारांना आहे, असे शरद पवार म्हणाले

अजित पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीबाबत शरद पवार म्हणाले, ''मला नक्की माहीत नाही, पण विरोधी पक्षनेता म्हणून त्यांना आमदारांची बैठक बोलावण्याचा अधिकार आहे.

मीटिंगबद्दल फारशी माहिती नाही पण मला माहीत आहे की संध्याकाळपर्यंत नेते भेटायला येतच राहणार आहेत.माझा अहमदनगरचा कार्यक्रम गेल्या आठवड्यातच रद्द झाला होता आणि सुप्रिया सुळे आधीच मुंबईहून पुण्याला जात आहे.''

राऊत यांनी हा दावा केला होता

शिवसेना (UBT) नेते संजय राऊत यांनी नुकताच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार भाजपमध्ये प्रवेश करू शकतात असा दावा केला होता. यानंतर त्यांच्या भाजपमध्ये प्रवेशाच्या चर्चांना उधाण आले होते. किंबहुना, अजित यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी भेट घेतल्याचे वृत्त समोर आले होते, त्यानंतर राऊत यांनी हा दावा केला आहे.

स्वत:ला मुख्यमंत्रीपदाचे दावेदार सांगितले

यापूर्वी एप्रिल 2023 मध्ये अजित पवार यांनी स्पष्टपणे मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली होती. ते म्हणाले होते की मला मुख्यमंत्री व्हायचे आहे आणि 2024 मध्ये ते अजूनही मुख्यमंत्री पदाचे दावेदार आहेत.

त्यासोबतच त्यांनी 2004 मध्ये काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीने जास्त जागा जिंकल्या असताना त्यांना मुख्यमंत्रीपद देण्याची संधी पक्षाने गमावली होती यावरही त्यांनी प्रश्न उपस्थित केला होता. मात्र, त्यांचा मुख्यमंत्रीपदाचा दावा कायम आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: घाटकोपर पूर्व विधानसभा मतदार संघात कोणी घेतली आघाडी ? भाजप विरुद्ध शरद पवार गटात थेट लढत

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळमध्ये सुनील शेळके यांची दणदणीत आघाडी

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT