महाराष्ट्र बातम्या

NCP Ajit Pawar News : पक्षांतर नव्हे, राष्ट्रवादीचा एकनाथ शिंदेंना पाठिंबा?, जे शिवसेनेचं झालं तेच राष्ट्रवादीचं...

संतोष कानडे

मुंबईः अजित पवार यांच्यासह नऊ मंत्र्यांनी काही वेळापूर्वी मंत्रिपदाची शपथ घेतली. सध्या तरी सगळ्यांच्याच डोक्यात गोंधळ सुरु आहे. अजित पवारांनी बंड केलं की राष्ट्रवादी काँग्रेसने शिंदे-फडणवीस सरकारने पाठिंबा दिला? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सध्या सूत्रांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार 'हे पक्षांतर नसून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच आहोत' अशी भूमिका अजित पवारांचा गट घेऊ शकतो. अजित पवारांसोबत २५ ते ४० आमदार असल्याचं सांगितलं जात आहे. थोड्याच वेळात अजित पवार हे पत्रकार परिषद घेणार आहेत. शरद पवार हेदेखील पत्रकार परिषद घेणार आहे.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड केल्यानंतर आम्ही शिवसेनेमध्येच आहोत, आमचीच खरी शिवसेना, अशी भूमिका त्यांनी घेतली होती. तशीच भूमिका अजित पवार घेऊन शकतात असं राजकीय जाणकार सांगत आहे.

दरम्यान, मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या नेत्यांमध्ये अजित पवार, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मराव आत्राम, आदिती तटकरे, संजय बनसोडे, अनिल पाटील यांचा समावेश आहे.

प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, हनस मुश्रीम, दिलीप वळसे पाटील हे बडे दिग्गज आणि शरद पवार यांच्या जवळचे नेते अजित पवारांसोबत होते.त्यामुळे हे बंड शरद पवार यांच्या संमतीने होत आहे का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया देतांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Holiday on Poll Day: मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर; नागरिकांना कर्तव्य निभावण्याचं आवाहन

Ambegaon Assembly Election : राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज केला दाखल

Hingoli Assembly Election 2024 : हिंगोली विधानसभा जिल्ह्यात दुसऱ्या दिवशी एकच अर्ज दाखल

Ajit Pawar : घड्याळाची टिकटिक कायम! अजित पवारांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; पक्षचिन्हाची दिली परवानगी पण...

IND vs NZ 2nd Test : What a Ball... रोहित शर्मा गांगरला, टीम साऊदीनं स्टम्प उडवला; तरीही दिवस भारताच्या नावावर राहिला

SCROLL FOR NEXT