NCP Ajit Pawar on Sharad Pawar 
महाराष्ट्र बातम्या

NCP Ajit Pawar : अजित पवारांचा काकांवर हल्ला! ''मुख्यमंत्रीपद डावललं, शिंदेंनी शपथ घेण्याआधीच भाजपशी...''

संतोष कानडे

NCP Political Crisis: शरद पवार गटापेक्षा अजित पवारांकडे जास्तीचं संख्याबळ असल्याचं दिसून येत आहे. मुंईतल्या एमईटी कॉलेजमध्ये बोलतांना अजित पवारांनी थेट शरद पवारांवर हल्ला केला. २००४ मध्ये हातचं मुख्यमंत्रीपद डावलल्यापासून ते मागच्या वर्षी शिंदेंनी शपथ घेण्यापूर्वीच भाजपशी सुरु असेलली बोलणी; इथपर्यंतचं सगळा इतिहास अजित पवारांनी बोलून दाखवला.

अजित पवार बोलतांना म्हणाले की, पवार साहेबांच्या छत्रछायेखाली मी घडलो आहे. ७७ ला देशपातळीवर निवडून आलेला जनसंघ पक्ष आता कुठंय? शोधावा लागतोय.

देशाला सक्षम नेतृत्वाची गरज असते ती आज मोदींच्या नेतृत्वात पूर्ण होत आहे. पंचविशीपासून पंच्याहत्तीपर्यंत आपण योग्य काम करु शकतो, अंगात बळ असते, जिद्द असते. नंतर मात्र क्षमता कमी होतात.

पुढे बोलतांना अजित पवार म्हणाले की, शरद पवार यांनी सोनिया गांधी यांना परदेशीच्या मुद्द्यावर विरोध केला होता. २००४ला छगन भुजबळ आणि आर.आर. पाटील यांच्या नेृत्वाखाली पक्षाला मोठं यश मिळालं. सोनियांनी मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीला देण्याविषयी भूमिका घेतली होती.

त्यावेळी पक्षात अनेक ज्येष्ठ नेते होते. त्यावेळी चार खाती जास्त घेऊन मुख्यमंत्रीपद सोडलं. त्यावेळी मुख्यमत्रीपद मिळालं असतं तर आजपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मुख्यमंत्री महाराष्ट्रात राहिला असता.

पवार पुढे म्हणाले, २०१४ मध्ये भाजपला न मागता पाठिंबा दिला. नंतर आम्हांला फडणवीसांच्या शपथविधीला उपस्थित रहायला सांगितलं. मी महाराष्ट्राला खोटं बोलणार नाही.

खोटं बोललो तर पवारांची औलाद सांगणार नाही. पुढे २०१७ मध्ये मीटिंग झाली होती. भाजपवाले म्हणाले २५ वर्षांचा आमचा पक्ष आहे सोडणार नाही. तेव्हाच युती तोडण्याचा प्लॅन झाल्याचं अजित पवारांनी स्पष्ट केलं.

''२०१७ ला शिवसेनेला जातीयवादी म्हणाले आणि २०१९ला शिवसेनेसोबत गेले. २०१९मध्ये शिंदेंनी शपथ घेण्याअगोदर भाजपच्या वरिष्ठांशी चर्चा सुरु होती. मी आणि वरिष्ठ नेते भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी बोलणी करण्यासाठी निघालोही होतो'' असा गौप्यस्फोट अजित पवारांनी केला.

शिवाय त्यांनी बोलतांना मागच्या तीन वेळेला मी उपमुख्यमंत्री झालो आहे असं सांगून माझी गाडी उपमुख्यमंत्रीपदावर अडलेली आहे. मलाही पुढे जायचं आहे, असं सांगितलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sakal Maratha Samaj: सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते मुंबईत दाखल; CM एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानाला घालणार घेराव

सत्ताधारी-विरोधक राजकारणात व्यस्त; मुद्द्यापासून वेगळीकडे लक्ष वळवण्याचं काम सुरू, वरळीत राज ठाकरेंचं शरसंधान

Dharavi: 5 हजार जणांचा जमाव; भडकाऊ पोस्ट व्हायरल अन् गर्दीत बाहेरचे लोक, धारावी मशीद प्रकरणी पोलिसांचा मोठा खुलासा

Satyapal Malik: "अंबानींची फाईल माझ्याकडं सहीसाठी आली होती, पण..."; सत्यपाल मलिकांचा खळबळजनक खुलासा

...नाहीतर हातपाय तोडू, पाकिस्तानी चित्रपट 'द लिजेंड ऑफ मौला जट' विरोधात MNS आक्रमक, थेट धमकीच दिली

SCROLL FOR NEXT