Ajit Pawar on RSS Weekly Organizer Criticism Esakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar: 'अजितदादांना घेऊन ब्रँड व्हॅल्यू कमी....', RSSमध्ये त्या लेखावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया

Ajit Pawar on RSS Weekly Organizer Criticism: अजित पवार यांना सोबत घेतल्यामुळे राज्यात भाजपचे नुकसान झाले असल्याचे खडेबोल संघाचे मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझरमधून सुनावण्यात आले आहे, त्यावर आज अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

लोकसभा निवडणुकीत काही राज्यांमध्ये भाजपला यश मिळाले नसल्यामुळे केंद्रात भाजप स्वबळावर येऊ शकली नाही. असे तर्क वितर्क लावले जात असतानाच भाजपची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (आरएसएस) भाजपने महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेतलेल्या निर्णयावर हल्लाबोल केला आहे. अजित पवार यांना सोबत घेतल्यामुळे राज्यात भाजपचे नुकसान झाले असल्याचे खडेबोल संघाचे मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझरमधून सुनावण्यात आले आहे. आरएसएसचे सदस्य रतन शारदा यांनी हा लेख लिहिला आहे. त्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांना माध्यमांनी सवाल केला असता त्यांनी यावर जास्त बोलणं टाळलं आहे.

आज पुण्यात बैठक झाल्यानंतर अजित पवारांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, "मला त्याच्याबद्दल काहीच बोलायचं नाही. या निवडणुका झाल्यानंतर अनेक राजकीय पक्षांची लोक आपली मतं व्यक्त करतात. त्यांची भूमिका स्पष्ट करतात. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं मत मांडायचा भूमिका व्यक्त करण्याचा त्यांना हक्क आहे. त्यांच्यावर मला कोणतीही टीका-टिपण्णी करायची नाही. मी विकासात लक्ष घातलेलं आहे. विकास करत आपल्या जिल्ह्याला, राज्याला, कशी आधिकची मदत करता येईल, महत्त्वाची कामे मार्गी लागतील याकडे लक्ष दिलं आहे", असंही पुढे अजित पवार म्हणालेत.

लोकसभेच्या 2019 च्या निवडणुकीच्या तुलनेत 2024 मध्ये महाराष्ट्रात भाजपचे मोठे नुकसान झाले आहे. या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सात तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला एक जागा मिळाली. रतन शारदा यांनी कोणत्याही नेत्याचे नाव न घेता म्हटले की, भाजपने अशा काँग्रेस नेत्याचा पक्षात समावेश केला, ज्याने उघडपणे भगव्या दहशतवादाबद्दल विधान केले होते. त्याने २६/११ ला आरएसएसचे षड्यंत्र म्हटले होते. तसेच आरएसएसला दहशतवादी संघटना म्हटले होते. यामुळे आरएसएस समर्थक खूप दुखावले गेले.

भाजपमध्ये आलेल्या या नेत्यांनी त्यांच्या या विधानावर खेद व्यक्त केला नाही किंवा माफी मागितली नाही. महाराष्ट्रातील या खेळीमुळे अनेक वर्ष काँग्रेसी विचारधारेला विरोध करणारा सच्चा भाजप समर्थक दुखावला. भाजप पार्टी विथ डिफरन्स अशी ओळख सांगतो, परंतु भाजपची ओळख पार्टी विदाऊट एनी डिफरन्स अशी झाली आहे.

काय लिहलं आहे लेखात?

अजित पवार यांना सोबत घेऊन भाजपने स्वत:ची ब्रँड व्हॅल्यू कमी केली. त्यामुळे महाराष्ट्रात पक्षाला झटका बसला आहे. भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेकडे बहुमत होते, मग अजित पवार यांना घेण्याची गरज काय होती? असा प्रश्न त्या लेखात विचारण्यात आला आहे. भाजपमधील नेते हे त्यांनाच राजकीय वास्वत कळते या मोठ्या भ्रमात राहिले आहेत. भाजपने निवडणुकीत सहकार्य करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांशी संपर्कही केला नाही. त्यांनी नि:स्वार्थपणे काम करणाऱ्या जुन्या समर्पित कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष केले.

अजितदादांना घेऊन ब्रँड व्हॅल्यू कमी केली

अजित पवार यांना सोबत घेऊन भाजपने स्वत:ची ब्रँड व्हॅल्यू कमी केली. त्यामुळे महाराष्ट्रात पक्षाला झटका बसला आहे. भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेकडे बहुमत होते, मग अजित पवार यांना घेण्याची गरज काय होती? असा प्रश्न त्या लेखात उपस्थित करण्यात आला आहे. भाजपने निवडणुकीत सहकार्य करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांशी संपर्कही केला नाही. त्यांनी नि:स्वार्थपणे काम करणाऱ्या जुन्या समर्पित कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात मतमोजणीला प्रत्यक्ष साडे आठ वाजता सुरुवात होणार

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: दहिसर मतदान केंद्रात निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार

Maharashtra Assemble Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT