Ajit Pawar sharad pawar esakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar : ''स्टॅम्प पेपरवर लिहून देतो, आमची मॅच फिक्सिंग नाही'', अजित पवारांचा कार्यकर्त्यांशी संवाद

संतोष कानडे

मुंबईः अजित पवार यांनी पक्ष कार्यकर्त्यांची एक बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये अजित पवारांनी शरद पवारांसोबतच्या नेहमीच्या भेटीवरुन होत असलेल्या चर्चांना उत्तर दिलं. शिवाय आपल्यासोबत आलेल्या कार्यकर्त्यांना आपण कधीच फसवणार नाही, असाही शब्द त्यांनी दिला.

अजित पवार म्हणाले की, लोकसभेच्या निडणुका तोंडावर आहेत. त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका होतील. इंडिया आघाडी भाजपसमोर तग धरु शकणार नाही. लोक मोदींना मतं देणार की खर्गेंना? तुम्हीच सांगा? असं म्हणत अजित पवार यांनी घेतलेल्या निर्णयासोबत ठाम असल्याचं स्पष्ट केलं.

पवार पुढे म्हणाले की, आम्ही कुटुंब म्हणून एकत्र आलो की कार्यकर्त्यांना वाटतं हे एकच आहेत. परंतु तसं काही नाहीये. आता नवीन भूमिका घेतलेली असून त्यात बदल होणार नाही. मी स्टॅम्प पेपरवर लिहून देतो की, आमच्यात कुठेच मॅच फिक्सिंग नाहीये.

अजित पवार पुढे म्हणाले...

  • माझ्यासोबत आलेल्यांना कधीही फसवणार नाही

  • मार्चमध्ये लोकसभेची आचारसंहिता लागणार आहे

  • संघटनेत चांगलं काम करा, लोकसभेनंतर विधानसभेची निवडणूक लागणार आहे

  • लोक मोदींना मत देणार की खर्गेंना, तुम्हीच सांगा?

दरम्यान, अजित पवारांनी भाजपशी घरोबा केल्यानंतर त्यांची शरद पवार यांच्याशी साधारण चार वेळेस भेट झालेली आहे. पुण्यात एका उद्योगपतींच्या निवासस्थानी गुप्त बैठक झाली. त्यानंतर दिवाळीमध्ये कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये तीन भेटी झाल्या. शिवाय दोन वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये काका-पुतणे एकाच मंचावर उपस्थित होते.

शरद पवार आणि अजित पवार यांच्यात मॅच फिक्सिंग आहे का? असा प्रश्न नेहमी उपस्थित केला जातो. त्यामुळे अजित पवारांनी आज थेट तसं काही नसून बाँडवर लिहून देतो म्हणत आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला. शिवाय येत्या निवडणुकांमध्ये भाजपसोबत खंबीरपणे उभं राहण्याचं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident: जुलूस मिरवणुकीत झेंडा फडकवताना दोघांना विजेचा झटका; एकाचा मृत्यू, वडगाव शेरीतील घटना

IND vs BAN 1st Test: भारताने चौथ्याच दिवशी बांगलादेशला केलं पराभूत! शतक अन् ५ विकेट्स घेणारा अश्विन विजयाचा शिल्पकार

Raj Thackeray: "पाकिस्तानी कलाकारांना नाचवणं..."; फवाद खानचा सिनेमा महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही, राज ठाकरेंचा इशारा

MBBS and BDS : एमबीबीएस, बीडीएसची दुसरी फेरी शुक्रवारपासून; पहिल्‍या फेरीनंतर अवघ्या काही जागा रिक्‍त

भयंकर अपघातातून वाचला अन् मेहनतीने केले पुनरागमन; Rishabh pant बद्दल काय म्हणाला Shubman Gill ?

SCROLL FOR NEXT