Ajit Pawar Eknath Shinde Devendra fadnavis Sakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar : भाजपा प्रवेशाची चर्चा सुरू असतानाच शिंदे, फडणवीसांसोबत अजित पवारांचा फोटो झळकला

अजित पवारांनी पत्रकारांशी बोलताना आपण जीवात जीव असेपर्यंत राष्ट्रवादीतच राहणार आहे, असं स्पष्टही केलं. मात्र तरीही या चर्चा थांबण्याचं नाव घेईना.

वैष्णवी कारंजकर

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार गेल्या काही दिवसांपासून भाजपासोबत जाणार असल्याच्या चर्चा आहे. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे ४० आमदारही जाणार असल्याचं बोललं जात आहे. अशातच शिंदे - फडणवीसांसोबत पवार बॅनरवर झळकले आहेत.

अजित पवारांनी पत्रकारांशी बोलताना आपण जीवात जीव असेपर्यंत राष्ट्रवादीतच राहणार आहे, असं स्पष्टही केलं. मात्र तरीही या चर्चा थांबण्याचं नाव घेईना. अशातच आता हा बॅनर चर्चेत आला आहे. शिवसेना भाजपा राष्ट्रवादी एकत्र लढणार अशा आशयाचा हा बॅनर आहे.

जळगाव जिल्ह्यातल्या धरणगाव बाजार समितीच्या निवडणुकीची सध्या जोरदार तयारी सुरू आहे. या निवडणुकीमध्ये शिवसेना व भाजपासोबत संजय पवार यांचा राष्ट्रवादी गटही निवडणूक लढवणार आहे. यासाठीच्या प्रचारादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्यासह अजित पवारांचा फोटो झळकला आहे.

Jalgaon Banner

अजित पवारांच्या भाजपासोबत जाण्याच्या चर्चा सुरू असतानाच असे बॅनर्स लागल्याने आता या चर्चांना आणखी हवा मिळाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navneet Rana: मोठी बातमी! नवनीत राणांच्या प्रचारसभेत राडा, अंगावार खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! नेमकं काय घडलं?

'PM मोदी उठता-बसता बाळासाहेबांचं नाव घेतात आणि उद्धव ठाकरेंच्याच पाठीत खंजीर खुपसतात'; प्रियांका गांधींचा हल्ला

Israel PM Netanyahu: इस्रायली पंतप्रधानांच्या घरावर बॉम्ब हल्ला; संरक्षण मंत्री म्हणाले, आता हद्द झाली...

Panchang 17 November: आजच्या दिवशी केशरी वस्त्र परिधान करावे

Latest Maharashtra News Updates : कोल्हापुरातील तपोवन मैदानावर योगी आदित्यनाथांची आज जाहीर सभा

SCROLL FOR NEXT