Ajit Pawar Press Conference Today esakal
महाराष्ट्र बातम्या

Gautam Adani: शरद पवार- गौतम अदानी भेटीवर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले...

रुपेश नामदास

उद्योजक गौतम अदानी यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची गुरूवारी भेट घेतली आहेत. सिल्वर ओकवर दोघांमध्ये तब्बत २ तास चर्चा झाली आली आहे. मात्र, दोघांच्यातील चर्चा अद्यार गुलदस्त्यात आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आलं आहे.

या भेटीवर विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते पुण्यात एका पत्रकार परिषदेत बोलत होते, ते म्हणाले की, शरद पवारांनी अदानीची भेट घेतली नाही तर अदानी शरद पवार यांच्याकडे आले होते, यांच्यामध्ये कोणत्या विषयावर चर्चा झाली याची माहिती आपल्याला नाही, अजून त्यांच्यावरचा आरोप सिध्द झाला नाही.

सुप्रिम कोर्टाने तपासासाठी समिती नेमली आहे त्यांचा अहवाल आल्यानंतर पुढील गोष्टी ठरतील. शरद पवार आणि अदानी यांची ओळख आहे, ओळखीच्या व्यक्तीने ओळखीच्या व्यक्तीशी भेटलं तर यात काही गैर नाही. अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली.

शरद पवारांनी अदानींची केली होती पाठराखण

हिंडेनबर्ग अहवालानंतर विरोधकांनी अदानी समूहाबाबत आक्रमक पवित्रा घेतला असताना शरद पवारांनी वेगळी भूमिका मांडली.

शरद पवार यांनी ‘एनडीटीव्ही’ला दिलेल्या मुलाखतीत संसद अधिवेशन, अदानी आदी अनेक मुद्यांवर भाष्य केले. पूर्वी सरकारवर टीकेची झोड उठविण्यासाठी टाटा-बिर्ला समूहांची नावे विरोधकांकडून घेतली जात होती. या समूहांचे देशाच्या विकासातील योगदान सर्वांना माहीत आहे.

आताच्या काळात अदानी-अंबानी समूहांची नावे सरकारला लक्ष्य करताना घेतली जातात. अंबानी समूहाने पेट्रोकेमिकल्स आणि अन्य क्षेत्रांत भरीव काम केले आहे. अदानी समूहाने वीज व अन्य क्षेत्रांत मोठे काम केले आहे.

देशाला त्याची गरज आहे. या समूहांनी बेकायदा किंवा काही चुकीचे केले असल्याचे पुरावे असतील तर टीका करण्याचा हक्क लोकशाहीत आहेच, पण पुरावे नसल्यास ते चुकीचे आहे’’, असे पवार म्हणाले.

काँग्रेसनं भाजपला घेरण्यासाठी अदानींविरोधातील हिंडेनबर्गचा मुद्दा लावून धरला आहे. अधिवेशनादरम्यान लोकसभा बंद पाडण्यापर्यंत हा मुद्दा तापला होता.

पण शरद पवार यांनी याप्रकणावर भाष्य करताना काँग्रेसनं लावून धरलेली जेपीसीची अर्थात जॉईन्ट पार्लमेंटरी कमिटीच्या चौकशीऐवजी सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधिशांमार्फत चौकशीची मागणी केली. त्यामुळं पवारांवर अनेकांनी टीकाही केली आहे.

अदाणी प्रकरणाची चौकशी व्हावी, असं मत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं होत. या प्रकरणात जेपीसी चौकशी का महत्त्वाची आहे यावर त्यांनी भाष्य केलं आहे.

सर्वसामान्य गुंतवणूकदारांचे कष्टाचे हजारो कोटी रुपये कुठे गेले, याचा शोध घेण्यासाठी अदानी उद्योग समूहाची नि:पक्षपातीपणे चौकशी झालीच पाहिजे, असेही ते म्हणाले.

दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी पुण्यातील रिक्त झालेल्या लोकसभेच्या जागेवर देखील भाष्य केलं. अजित पवार म्हणाले की, ज्यावेळ ही निवडणुक लागेल त्यावेळी आम्ही महाविकास आघाडी मधील नेते एकत्र बसून कोणाला उमेदवारी द्यायची यावर चर्चा करू, तेथील राजकीय परिस्थिती काय आहे, कोणाची तिथ ताकत आहे.

मागील काळात झालेल्या महानगर पालिकेच्या निवडणुकीत मविआच्या कोणत्या पक्षाला जास्त जागा मिळाल्या आहेत, कोणाचे किती नगरसेवक आहेत. या सगळ्यांवर चर्चा करून या जागेवर निर्णय घेवू" अशी प्रतिक्रिया विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: महायुतीला जिंकवणाऱ्या लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? आता १५०० नाही तर....

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार कोण आघाडीवर?

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: इस्लामपूर मतदारसंघात जयंत पाटील आघाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या अथक मेहनतीचा हा विजय

Maharashtra Election 2024: जरांगे फॅक्टर फेल! महाराष्ट्रात महायुतीनं मारली मुसंडी, भाजप रेकॉर्डब्रेक आघाडी

SCROLL FOR NEXT