supriya sule and sunetra pawar sakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar : "बहीणीच्या विरोधात सुनेत्रा यांना उभं करायला नको होतं..."; अजित पवार म्हणाले, चूक झाली

रोहित कणसे

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत पत्नी सुनेत्रा पवार यांना बहीण सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उभे करून चूक केल्याचे जाहीरपणे मान्य केले आहे. अजित पवारांनी ज्या निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचा सुप्रिया सुळेंकडून पराभव झाला होता, त्या निवडणुकीबाबत पवारांनी खंत व्यक्त केली आणि हा निर्णय राष्ट्रवादीच्या संसदीय मंडळाने घेतल्याचेही नमूद केले.

यावेळी अजित पवार यांनी कौटुंबिक संबंधांपासून राजकारण दूर ठेवण्यावर देखील भर दिला. 'जय महाराष्ट्र' या मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अजित पवारांना याबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता.

बारामतीची लाडकी बहीण आहे का? या प्रश्नाचे उत्तर देताना अजित पवार म्हणाले की, माझ्या सगळ्याच बहीणी लाडक्या आहेत. राजकारण राजकारणाच्या ठिकाणी... पण माझ्या सगळ्या बहीणी लाडक्या आहेत. अनेक घरांमध्ये राजकारण चालतं. राजकारण घरामध्ये शिरू द्यायचं नसतं. पण माझ्याकडून थोडीशी चूक झाली, मी माझ्या बहीणीच्या विरोधात सुनेत्रा यांना उभं करायला नको होतं. पण पार्लमेंट्री बोर्डाने निर्णय घेतला. पण एकदा बाण सुटल्यावर आपण काही करू शकत नाही. पण आज माझं मन मला सांगतं की तसं व्हायला नको होतं.

राखी पौर्णीमेला जाणार का? याप्रश्नावर बोलताना अजित पवार म्हणाले की, सध्या माझा राज्याचा दौरा सुरू आहे. पण त्या वेळेला मी तेथे असेल आणि बहीणीपण तेथे असतील तर मी तेथे जाणार असेही अजित पवार म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघात खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवारांना उमेदवारी देण्यात आली होती. यामुळे या मतदारसंघात पवार कुटुंबातील दोन उमेदवार आमनेसामने आले होते. या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. दोन्ही पक्षांकडून येथे जोर लावण्यात आला पण अखेर निवडणुकीत सुप्रिया सुळे यांनी १ लाख ५८ हजार मतांनी विजय मिळवला होता. यानंतर आता अजित पवारांनी सुप्रिया सुळेंविरोधात सुनेत्रा पवारांना उमेदवारी देणं ही माझी चूक होती असे मान्य केले आहे.

दरम्यान सध्या राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हलचालींनी प्रचंड वेग आला आहे. सर्व राजकीय पक्षांचे नेते सध्या राज्यात सभा घेत आहेत. यादरम्यान सध्या अजित पवार महिलांना आर्थिक मदत करण्याच्या उद्देशाने असलेल्या 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'चा प्रचार करण्यासाठी राज्यव्यापी 'जन सन्मान यात्रे'वर आहेत. या दौऱ्यात त्यांच्याकडून जागोजागी नागरिकांच्या भेटी तसेच इतर कार्यक्रम घेतले जात आहे. अजित पवार जनसन्माम यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेशी संपर्क साधणार आहेत. दरम्यान पक्षाकडून या यात्रेचे काटेकोर नियोजन करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधींची प. महाराष्ट्रात राजकीय मशागत; सांगलीनंतर एकाच महिन्यात कोल्हापूर दौरा, नेमकं काय घडणार?

'सारं काही तिच्यासाठी' फेम खुशबू तावडे दुसऱ्यांदा झाली आई; दिला गोंडस बाळाला जन्म; मुलगा की मुलगी?

Assembly Elections 2024 : तुमचं बर हाय, आमची फरपट कवा थांबणार? भोकर मतदारसंघात भावी आमदारांची गर्दी, मूलभूत गरजांची वाणवा

Navratri Recipe : नवरात्रीचा उपवास! सोप्या पद्धतीने घरी बनवा पौष्टिक उपवासाची खांडवी

Elon Musk: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X आर्थिक संकटात; इलॉन मस्कला मोठे नुकसान, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT