राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थितीत नसल्याचे दिसून आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अधिवेशन हे पाच दिवसात आटोपण्यात आले. मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत पार पडलेल्या अधिवेशनात काही मुद्यांवर गोंधळ झाला. पण बरेच मुद्दे मार्गी लागले याचे समाधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिवेशन संपल्यानंतर व्यक्त केले. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी अनेक मुद्यांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अधिवेशनाला का नव्हेत यामागचे कारणही सांगितले. (ajit pawar say reason behind Chief Minister Uddhav Thackeray absent during winter session sbj86)
कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) अधिवेशनात सहभागी झाले नाहीत. आम्हीच त्यांना अधिवेशन पार पाडतो, असे म्हटले होते, अशी माहिती अजित पवारांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. अधिवेशनानंतर अजित पवारांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अधिवेशनाला मुख्यमंत्री गैरहजर का होते याच्यामागचे कारण सांगितले.
मुख्यमंत्री विधीमंडळात उपस्थितीत नसले तरी वर्षा बंगल्यावरुन ते आपली जबाबदारी पार पाडत होते, असा उल्लेखही उप मुख्यमंत्र्यांनी केला. ते पुढे म्हणाले, विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना पत्र लिहले होते. मतदानात पारदर्शकता यावी यासाठी नियमात बदल करत आवाजी मतदान घेण्याची तयारी केली होती. लोकसभेत जे नियम आहेत त्याप्रमाणे नियमात बदल केले. पण राज्यपालांना यासंदर्भात कोणताही निर्णय घेतला नाही. राज्यपालांनी घटनात्मक बाबींचा दाखला देत निर्णय घेण टाळल्याची माहिती अजित पवारांनी दिली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshiyari) यांना लिहिलेल्या पत्राची जोरदार चर्चा प्रसारमाध्यमात रंगली होती. मुख्यमंत्र्यांनी कठोर शब्दात पत्र लिहिले होते यात कोणतेही तथ्य नाही, असेही अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांचा स्वभाव सर्वांनाच माहित आहे, असे सांगत त्यांनी उद्धव ठाकरे हे संयमी असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला. ते पुढे म्हणाले की, राज्यपालांचा आम्ही आदर करतो. घटनातज्ज्ञांचा सल्ला घेऊन पुढे निवडणुक पार पाडू. पुढील दोन-तीन दिवसांत आम्ही विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी मुख्यमंत्र्यांसह राज्यपालांची भेट घेणार आहोत, अशी माहितीही अजित पवारांनी यावेळी दिली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.