Ajit Pawar Press Conference Today esakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar : "माझं वकीलपत्र घेऊ नका"; संजय राऊतांना नाव न घेता लगावला टोला

दुसऱ्या पक्षाचे लोक आमच्या पक्षाचे प्रवक्ते का झालेत, मला माहित नाही.

वैष्णवी कारंजकर

अजित पवार भाजपासोबत जाणार अशा चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. राष्ट्रवादीचा मित्रपक्ष असलेल्या ठाकरे गटाचं मुखपत्र असलेल्या सामनातूनही याबद्दल भाष्य करण्यात आलं होतं. त्यानंतर आता अजित पवारांनी माध्यमांशी बोलताना सुनावलं आहे.

माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले, आम्ही सगळे जण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच आहोत, पक्षातच राहणार आहोत, याला कोणताही आधार नाही. इतर राजकीय पक्षाचे लोक याबद्दल स्वतःची मतं व्यक्त करत आहेत. त्यांनी खुशाल करावीत, त्यांना तो हक्क आहे. आज मी माझ्या कार्यालयात बसतो, त्यावेळी आमदारांच्या मीटिंग्ज असतात. मंत्रालयात आलेले आमदार मला भेटायला आले, त्याचा वेगळा अर्थ काढू नका.

अजित पवारांनी संजय राऊतांना नाव न घेता टोला लगावला आहे. पवार म्हणाले, "माझ्याबद्दलच्या बातम्या जाणीवपूर्वक पसरवल्या जात आहेत. राज्यासमोरच्या महत्त्वाच्या प्रश्नांवरुन लक्ष विचलित कऱण्यासाठी हे केलं जात आहे. एवढं का प्रेम उतू चाललं आहे माझ्यावर? माझ्याबद्दल बातम्या पेरण्याचं काम काही विघ्नसंतोषी लोक करत आहेत. माझ्या पक्षातले लोक नाही, पण पक्षाच्या बाहेरचे."

काही बाहेरच्या पक्षाचे लोकपण आमच्या पक्षाचं प्रवक्तेपद घ्यायला लागले आहेत. मी आता बैठकीत बोलणार आहे. तुम्ही ज्या पक्षाचे मुखपत्र आहे, त्याबद्दल बोला. पण तुम्ही आमच्याबद्दल बोलू नका. आम्ही आमची भूमिका मांडायला खंबीर आहोत. तुम्ही आमचं वकीलपत्र घेऊ नका. त्यांनी त्यांची त्यांची भूमिका मांडावी. आमची भूमिका मांडायला आमच्या पक्षाचे नेते, प्रवक्ते मजबूत आहेत. कारण नसताना अशा बातम्या आल्या. उद्धव ठाकरे म्हणाले की मी एकटा लढेन. मी त्यांना भेटून सांगितलं की या चर्चांत काही तथ्य नाही, असं म्हणत अजित पवारांनी सुनावलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrakant Tingare : पुण्यात चंद्रकांत टिंगरेंवर हल्ला; वडगावशेरीत घडली घटना

Latest Marathi News Updates : भाजपाच्या राष्ट्रीय सरचिटणीसांना पैसे वाटावे लागणे दुर्दैवी - अंबादास दानवे

...म्हणून 'हम साथ साथ है' मध्ये माधुरी दीक्षितला घेतलं नाही; म्हणते- मी चित्रपटाला नकार दिलाच नव्हता

Vinod Tawde : अन् विनोद तावडे आणि हितेंद्र ठाकूर एकाच गाडीतून हॉटेलमधून पडले बाहेर, कारण काय?

IND vs AUS : भारताचे आघाडीचे ६ फलंदाज ठरले? एका फोटोने पर्थ कसोटीसाठीची स्ट्रॅटजी केली उघड

SCROLL FOR NEXT