Ajit Pawar 
महाराष्ट्र बातम्या

"सोनिया गांधी विलासरावांना म्हटल्या होत्या, पण..."; अजिदादांनी सांगितला दोनदा मुख्यमंत्रीपद हुकल्याचा किस्सा

Sandip Kapde

Ajit Pawar : भाजपशी हातमिळवणी केल्यापासून अजित पवार सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. तेव्हापासून ते लवकरच महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चा सातत्याने होत आहेत. मात्र, त्यांना सरकारमध्ये सहभागी होऊन २ महिन्याहून अधिक काळ लोटला आहे. आज अजित पवार यांचा बारामतीत जाहीर नागरी सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी २००४ चा एक किस्सा सांगितला.

अजित पवारांबाबत महाराष्ट्रातील जनतेसह राजकीय पक्षांमध्ये उत्सुकता होती की, अजित पवार याआधी चार वेळा उपमुख्यमंत्री झाले आहेत. मग त्यांनी पाचव्यांदा राज्याचे उपमुख्यमंत्री पद का निवडले? आज बारामतीत देखील अजित पवार भावी मुख्यमंत्री असे पोस्टर झळकले. अजित पवार भावी मुख्यमंत्री अशा घोषणा देण्यात आल्या. (latest marathi news)

अजित पवार यांचे भाषण संपत असताना कार्यकर्ते अजित पवार भावी मुख्यमंत्री, अशा घोषणा देत होते. यावर अजित पवार यांनी स्पष्ट मत मांडले.

अजित पवार म्हणाले "जाताना कशाला विषय काढता. २००४ ला देखील राष्ट्रवादी काँग्रेसला मुख्यमंत्रीपद मिळालं असतं. पण मी काय करणार. काही गोष्टी मला बोलता येत नाहीत. तेव्हा सोनिया गांधी विलासरावांना म्हटल्या की विलासराव राष्ट्रवादीचे जास्त आमदार निवडून आले आता त्यांचा मुख्यमंत्री त्यांचे आमदार ठरवतील पण नाही होऊ शकलं."

"त्या नंतरच्या काळात जेव्हा उद्धव ठाकरेंना पाठिंबा दिला. त्यावेळी उद्धव ठाकरेंचे ५६ होते आपले ५४ आमदार होते.अडीच-अडीच वर्षे झालं असतं. पण तशी चर्चा झाली नाही. मी त्या चर्चेत नव्हतो. त्यामुळे मला खोलात जायचे नाही," असे अजित पवार म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

Trending News : काॅंग्रेसचे दोन गट भररस्त्यात भिडले, तितक्यात अॅम्बुलन्स आली अन् पुढे जे घडलं...

SCROLL FOR NEXT