Ajit Pawar 
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar : अजित दादांच्या मनात चाललयं तरी काय? पवारांच्या राजीनाम्यावेळी त्यांच्या या ४ कृती ठरल्या लक्षवेधी

शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत निवृत्तीची घोषणा केली.

धनश्री ओतारी

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत निवृत्तीची घोषणा केली. त्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली पण सर्वांचे लक्ष विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडे वेधले. पवारांच्या घोषणेनंतर यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये अजित पवारांच्या ४ कृती लक्षवेधी ठरल्या. त्यामुळे राजकीय गोटात अजित दादांच्या मनात चाललयं तरी काय? अशा सवाल उपस्थित होत आहे. इतकेच नव्हे तर पक्ष कार्यकर्त्यांच्या विरोधात अप्रत्यक्ष भूमिका त्यांची दिसली.

‘लोक माझे सांगाती’ आत्मचरित्र प्रकाशनाचा कार्यक्रम मंत्रालयासमोरील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये सुरू असताना शरद पवार यांनी आपल्या भाषणात राजीनाम्याची घोषणा केली. त्यानंतर सेंटरमध्ये एकच खळबळ उडाली. यावेळी अजित पवारांनी सगळी सूत्र हातात घेत सर्वांचे लक्ष वेधले.

पवारांच्या राजीनाम्यावेळी त्यांच्या या ४ कृती ठरल्या लक्षवेधी

माईक हातातून हिसकावला...

शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा केल्यानंतर सेंटरमध्ये पवारांची मनधरणी सुरु होती. सर्वत्र एकच खळबळ माजली होती. त्याचदरम्यान राष्ट्रवादी युवक अध्यक्ष मेहबूब शेख यांच्या हातातून माईक हिसकावून घेत अजित पवारांनी त्यांना चांगलंच सुनावलं.

त्यानंतर फोन हिसकावला...

मेहबूब शेख यांना कोणत्यातरी नेत्याचा फोन आला होता. यावेळी शेख शरद पवार यांना फोन देत असताना अजित पवार यांनी मध्ये येत त्यांचा फोन काढून घेतला अन् तो फोन संतापात टेबलावर अपटला. संदीप बोलोना तुझ्याशी...पुन्हा पुन्हा काय... असा संतप्त सवाल क्या कार्यकत्याला केला.

आम्ही काय मुर्ख आहोत का?

शरद पवार यांना आपण समजावू. ते आपलं ऐकतील. त्यांना जेवायला जाऊ द्या. अस प्रफुल्ल पटेल यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं. तेव्हा मेहबूब शेख यांनी आक्रमक पवित्र घेत आम्ही उपोषण करु असा इशारा दिला. त्यानंतर अजितदादा पुन्हा भडकले. प्रफुल्ल पटेल समजावताना परस्पर वागायला आम्ही काय मुर्ख आहोत का? तुलाच काही कळतयं का? असा संताप व्यक्त करत पुन्हा माईक हिसकावला.

जयंत पाटील विरोधात अजित पवार

पवारसाहेब तुमच्या नावाने आम्ही लोकांना मतं मागतो. तुमच्या नावाने लोक पक्षाला मतं देतात. आज तुम्हीच जर बाजूला गेले तर आम्ही लोकांसमोर काय म्हणून जायचं, कुणाच्या नावाने मतं मागायची..? आज तुम्ही राजकारणात राहणं, हे फक्त राज्यातल्या लोकांसाठीच नाही तर देशातल्या लोकांसाठी गरजेचं आहे.

आज राष्ट्रवादी पक्ष पवारसाहेबांच्या नावाने ओळखला जातो. तुम्ही असं अचानक बाजूला जाणं हे कुणालाही रुचणारं नाहीये. तुम्हाला निवृत्तीचा कोणताही अधिकार नाही, परस्पर निर्णय घेण्याचा अधिकार नाही, अशा भावना जयंत पाटील यांनी बोलून दाखवल्या.

त्यानंतर अजित पवार यांनी विरोधी भूमिका घेत पवारांच्या निर्णयावर कुणी भावूक होऊ नका, हा निर्णय कधी ना कधी घ्यावा लागणारच होता. तो साहेबांनी आज घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Result 2024: एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांचं काय झालं? महाराष्ट्राचा कल काय सांगतोय? जाणून घ्या

Maharashtra Assembly Results: लाडकी बहीण पावली! महायुतीला 'एक हे तो सेफ हे'ची जोड अन् झटक्यातच मविआचा हिरमोड

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: पुन्हा निवडणुका घ्या, हा जनमताचा कौल नाही - संजय राऊत

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

SCROLL FOR NEXT