राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात राजकीय निवृत्तीची घोषणा केली. मात्र, राजकीय वर्तुळात चर्चा ही वेगळीच सुरु आहे. ''तुम्ही थांबलात तर आम्ही थांबतो!'' असं प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं. त्यात अजित पवार यांनी जयंत पाटील यांच्यातील संघर्षाच्या चर्चेला पुन्हा उधाण आलं आहे. त्यामुळे जयंत पाटील खरचं राजीनामा देणार का ? असा सवाल उपस्थित होत आहे. ( ajit pawar vs jayant patil Resign sharad pawar announcement retirement )
राष्ट्रवादी पक्षातील पहिल्या फळतील दोन दिग्गज नेते म्हणून अजितदादा अन् जयंत पाटील यांच्याकडे पाहिलं जातं. पण, मागच्या काही दिवसांपासून अजितदादा आणि जयंत पाटील यांच्यामध्ये संघर्ष असल्याच्या चर्चा सुरू आहेत.
गृहमंत्री पद न मिळाल्याने अजितदादांच्या मनात खंत
महाविकास आघाडी सरकारमध्ये गृहमंत्रीपद न मिळाल्याने अजित पवार यांच्या मनात खंत आहे. ही त्यांनी काही दिवसांपूर्वी बोलून दाखवली आहे. 'राष्ट्रवादीकडून जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ हे नेते गृहमंत्रीपदी विराजमान झाले, मात्र मला गृहमंत्रीपद मिळाले नाही,' असे अजित पवार म्हणाले होते. त्यानंतर दोघांच्यात वादाला सुरुवात.
तरुण अर्थमंत्री म्हणून जयंत पाटील यांनी आपली जागा पक्की
१९९९ च्या आघाडी सरकारच्या काळात अजित पवार सिंचन मंत्री होते. मात्र, त्याचवेळी सर्वात तरुण अर्थमंत्री म्हणून जयंत पाटील यांनी आपली जागा पक्की केली. 1999 ते 2008 पर्यंत ते राज्याचे अर्थमंत्री होते. 2014 पूर्वी पृथ्वीराज चव्हाण मंत्रिमंडळात ते ग्रामविकास मंत्री होते. २००४ लाही जयंत पाटील गृहमंत्री राहिले.
अजित पवारांची विधीमंडळ गटनेतेपदावरुन हकालपट्टी
पहाटेच्या शपथविधी या राजकीय नाट्यावेळी अजित पवारांची विधीमंडळ गटनेतेपदावरुन हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर जयंत पाटील यांची विधीमंडळ नेतेपदी नियुक्ती करण्यात आली.
अजितदादांसह जयंत पाटील यांची भावी मुख्यमंत्री म्हणून चर्चा
मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा सुरु असताना जयंत पाटील यांचीही भावी मुख्यमंत्री म्हणून चर्चा. धाराशिव नंतर अनेक ठिकाणी अजित पवार यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर झळकले. त्याच दरम्यान, खासदार अमोर कोल्हे यांनी भावी मुख्यमंत्री म्हणून जयंत पाटील यांचा चेहरा योग्य असल्याचे म्हटले होते.
अजित पवारांचा रोख त्यावेळी जयंत पाटलांच्या सांगली जिल्ह्यावर
डिसेंबर महिन्यात शरद पवारांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमातही अजित पवारांच्या विधानानं अनेकांचं लक्ष वेधून घेतलं. 'आपण असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे असं म्हणतो. प्रत्येक नेत्याने आपल्या जिल्ह्यातून जास्त आमदार निवडून आणण्याचे प्रयत्न करा.
आपण राज्यात पहिल्या क्रमांकावर जाऊ. याच्यामध्ये अपवाद फक्त, नाशिक, पुणे आणि बीड जिल्हा आहे,' असं अजित पवार म्हणाले होते. अजित पवारांचा रोख त्यावेळी जयंत पाटील यांच्या सांगली जिल्ह्यावर होता का? असे प्रश्न्ही विचारले गेले होते.
हिवाळी अधिवेशनात जयंत पाटील यांचं निलंबन करण्यात आलं होतं, तेव्हा अजित पवारांनी विधानसभेत दिलगिरी व्यक्त केली होती. तसंच जयंत पाटलांच्या निलंबनावेळी अजित पवार फार आक्रमक नसल्याचंही बोललं गेलं.
पवारांचे सर्वाधिक विश्वासू
जयंत पाटली हे इस्लामपूरचे आमदार आहेत. ते विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री होते. तब्बल 9 वेळा अर्थसंकल्प मांडण्याचा विक्रम त्यांनी केला आहे. 2008मध्ये आर. आर. पाटील यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर जयंत पाटील यांच्याकडे गृहमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली होती.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे ते सर्वात विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात. 2019मध्ये त्यांच्याकडे राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा देण्यात आली. या पदासाठी धनंजय मुंडे, सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील आदी मातब्बर नेत्यांची नावे चर्चेत होती. मात्र, पवारांनी जयंत पाटील यांच्या नावाला पसंती दिली.
पवार कुटुंबाशी घनिष्ट
जयंत पाटील हे शरद पवार यांच्या अत्यंत जवळचे आहेच. परंतु, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी त्यांचा चांगला समन्वय आहे. राष्ट्रवादीत ते अजितदादांच्या बरोबरीचे नेते म्हणूनही ओळखले जातात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.