Ajit Pawar Will be New Deputy Chief Minister : राज्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी पुन्हा एकदा आपण गेम चेंजर्स असल्याचे दाखवून दिले आहे. त्यांनी पुन्हा एकदा बंडाचे निशाण फडकावत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तूळात सुरु झाली आहे. दादांनी पुन्हा मोठा राजकीय भुकंप केल्याचे दिसून आले असून त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
यासगळ्यात एक गोष्ट पुन्हा समोर आली आहे ती म्हणजे जर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तर मुख्यमंत्रीपदी कोण असणार याची. हे चित्र आज संध्याकाळपर्यत स्पष्ट होणार असल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीचे ९ आमदार शपथ घेणार असल्याचेही टीव्ही सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सांगितले जात आहे. त्यामुळे येत्या काही वेळात राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी होणार असल्याचे बोलले जात आहे.
छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील यांच्यासह आणखी काही आमदार शपथविधी घेणार असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे काही वेळेपूर्वी शरद पवार यांची पत्रकार परिषद पार पडली होती. त्यात त्यांनी आपल्याला अजित पवारांच्या बैठकीविषयी काहीच माहिती नसल्याचे म्हटले होते. मात्र यासगळ्यात मुख्यमंत्रीपदावर कोण राहणार याविषयी उलट सुलट चर्चा सुरु झाल्या आहेत.
दरम्यान, विरोधीपक्ष पवार यांनी देवगिरी या बंगल्यावर राष्ट्रवादीच्या समर्थक आमदारांची बैठक घेतली होती. या बैठकीत राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी अजित पवारांनी स्विकारावे अशी अग्रही भूमिका घेतल्याची माहिती समोर आली होती. यानंतर पुण्यात असलेल्या शरद पवारांनी या बैठकीबद्दल त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.