मुंबई : राज्यात मुख्यमंत्री बदलाच्या ज्या चर्चांना ऊत आला आहे, त्यावर विधान स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती यांनी भाष्य केलं आहे. मी चॅलेंज देऊन सांगतो अजित पवार हे मुख्यमंत्री होणार नाहीत, असं त्यांनी म्हटलं आहे. मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटर इथं आयोजित स्वराज्य संघटनेच्या प्रथम वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यातील राजकारणावर भाष्य करताना अजित पवारांवर त्यांनी सडकून टीकाही केली. (Ajit Pawar will not be CM Sambhaji Raje claims Maharashtra Politics Eknath Shinde Devendra Fadnavis)
"राज्यघटना पाहिजे तशी ट्विस्ट करायची, हा काय प्रकार सुरु आहे महाराष्ट्रात. आता लोक म्हणतात की, मुख्यमंत्री जाणार! म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जाणार आणि अजितदादा मुख्यमंत्री होणार. पण माझं चॅलेंज आहे की होऊच शकत नाहीत" असं वातावरण जाणीवपूर्वक तयार केलं जातं. हे होऊच शकत नाही कारण यांचं ठरलेलं आहे सगळं, अशा शब्दांत संभाजीराजे यांनी सडकून टीका केली.
"देवेंद्र फडणवीस आधी राष्ट्रवादीसोबत युती कदापी नाही, कदापी नाही, कदापी नाही असं सांगत होते. तसेच अजित पवारांना तुरुंगात पाठवण्याची भाषा करत होते. पण त्यांनाच यांनी आता सोबत घेतलं आहे. गरज नसताना तुम्ही त्यांना बरोबर घेतलं आहे, लोकसभेसाठी तुम्ही हे केलं आहे का? असा सवालही संभाजीराजेंनी केला.
आता तर प्रश्न आहे की हे तिघे एकत्र लढणार कसे? हा एक डोकेदुखीचाच प्रश्न आहे त्यांच्यासाठी. आपल्यासाठी हे फायद्याचं आहे. पण माझा प्रश्न आहे की काय गरज होती अशी युती करायची. एकाच मतदारसंघात तिघांनाही उभं करुन टाका. मला तर असंही वाटतंय की, हे ९ मंत्री आणि हे राष्ट्रवादीवाले मोठ्या साहेबांकडं जाणार. पण हे सर्वजण परत एकत्र आले तर काय? याचं उत्तर राष्ट्रवादीचे नेते देऊ शकतील का?, असंही संभाजीराजे यावेळी म्हणाले.
दरम्यान, यावेळी संभाजीराजे यांनी भाजपला आपल्या जुन्या वचनांची आठवण करुन देताना मराठा आरक्षण आणि अरबी समुद्रात होणाऱ्या शिवस्मारकाचं काय झालं? पंतप्रधानांच्या हस्ते जलपूजन करुन नऊ वर्षे झाली तरीही हे काम अजून सुरु का होत नाही? असा सवालही त्यांनी यावेळी केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.