Ajit Pawar Esakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar: अजित पवार शरद पवारांविरुद्ध बंड करणार? 2004 पासून मनात खदखद

महाराष्ट्रातील काका-पुतण्याचा वाद पुन्हा चर्चेत

धनश्री ओतारी

गेल्या काही दिवसांपासून विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपसोबत जात सत्तास्थापन करणार या चर्चेला उधाण आलं आहे. अशातच काल अजित पवार यांनी आमदार अपात्र ठरले तरी शिंदे सरकार स्थिर असल्याचे सांगत ‘मविआ’ नेत्यांच्या मनसुब्यांमधील हवाच काढून टाकली. त्यामुळे अजित पवार शरद पवारांविरुद्ध बंड करणार का? या प्रश्नाने राजकीय वर्तुळात जोर धरला आहे. (Ajit Pawar will revolt against Sharad Pawar ncp bjp Maharashtra politics )

अजित पवार शरद पवारांविरुद्ध बंड करणार अशी शक्यता वर्तवण्यात येत असतानाच मिळालेल्या माहितीनुसार अजित पवार यांनी दिवसभरातील सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. ते सध्या मुंबईत आहेत. तर शरद पवार आणि सुप्रिया सुळे बारामती मध्ये असल्याची माहिती आहे.

सध्याच्या राजकीय घडामोडींमुळे महाराष्ट्रातील 'काका-पुतण्या' वादाबाबत चर्चा पुन्हा सुरु झाली आहे. महाराष्ट्राला काका-पुतण्या वाद नवीन नाही. या वादाची कारणं राजकीय असल्याने महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारी असल्याचे सांगण्यात येत आहे.

शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील मतभेद हे महाराष्ट्राच्या राजकारणात कायमच चर्चेचा मुद्दा राहिला आहे. याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात अजित पवार यांनी मनातील खदखद बोलून दाखवली होती.

2004 पासून अजित पवारांच्या मनात खदखद

२००४ साली विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. मात्र तेव्हा हातातोंडाशी आलेली मुख्यमंत्रिपदाची संधी पक्षाने दवडली होती. दरम्यान, २००४ साली मुख्यमंत्रिपदावर पाणी सोडणं ही सर्वात मोठी चूक होती. कुणालाही मुख्यमंत्री केलं असतं तरी चाललं असतं, असं विधान त्यांनी केलं.

या निवडणुकीत राष्ट्रवादीला 71 आणि काँग्रेसला 69 जागा मिळाल्या होत्या. त्यामुळं मुख्यमंत्रिपद राष्ट्रवादीकडे यायला हवं होतं. परंतु, शरद पवार यांनी त्यावेळी काँग्रेसबरोबर बोलणी करून महाराष्ट्राचं मुख्यमंत्रिपद काँग्रेसला दिलं आणि त्याबदल्यात दोन कॅबिनेट व एक राज्यमंत्रिपद जास्तीचं घेतलं. त्यामुळं शरद पवार आणि अजित पवार यांच्या मतभेदाला सुरुवात झाली.

त्यानंतर 2009 च्या निवडणुकीत सुद्धा तिकीट वाटपावरून शरद पवार आणि अजित पवार यांच्यात सौम्य स्वरूपाचे मतभेद झाले होते.

भुजबळ यांना उपमुख्यमंत्री बनवण्यावरूनही अजित पवार नाराज

अजित पवार यांचे संबंध सुरुवातीपासूनच भारतीय जनता पक्षाशी चांगले आहेत. सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेला सहकार्य देण्यात अजित पवार यांना अडचण वाटत होती. सन २००८ मध्ये छगन भुजबळ यांना उपमुख्यमंत्री बनवण्यावरूनही अजित पवार नाराज होते. त्याच प्रमाणे सन २०१० मध्ये अशोक चव्हाण यांनी त्यांचे नाव आदर्श घोटाळ्यात आल्यानंतर राजीनामा दिला होता.

2012 साली अजित पवारांवर सिंचन घोटाळ्याचा आरोप झाला. त्यावेळी अजित पवार यांनी अचानक राजीनामा दिला होता.

पुत्र पार्थच्या पराभवाची सल

लोकसभा निवडणुकीत पुत्र पार्थ पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हवे तसे सहकार्य केले नव्हते आणि म्हणूनच पार्थ पवार यांचा पराभव झाला असे मानत अजित पवार नाराज झाले होते.

शरद पवार यांनी पार्थ पवारांच्या उमेदवारीला विरोध केला होता. यावेळचा मतभेदाचा मुद्दा ताणला गेला आणि उघड मतभेद झाला. पुढे पार्थ पवार यांनी मावळमधून निवडणूक लढलेच. त्यात ते पराभूत झाले. यावेळीही अजित पवार आणि शरद पवार यांच्यातील मतभेद प्रकर्षानं पाहायला मिळाले.

२०१९ मधील बंडखोरी

बंडखोरी करत भारतीय जनता पक्षाला साथ देणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार शपथ घेत राज्याचे उपमुख्यमंत्री बनले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या सर्वात जवळचे समजले जाणारे अजित पवार अशा प्रकारचे पाऊल उचलतील असे खुद्द पवार यांना वाटत नव्हते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Auction 2025 मधून तब्बल १००० खेळाडूंचा पत्ता कट; आता २०४ जागांसाठी ५७४ खेळाडू रिंगणात; जाणून घ्या तपशील

School Holiday: शाळांना ‘इलेक्शन डे’ सह तीन दिवस खरंच सुट्टीए का? शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण

Karad South Assembly Election : देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर माफी मागावी, अन्यथा त्यांना कराड तालुक्यात पाऊल ठेवून देणार नाही - शिवराज मोरे

SA vs IND 4th T20I: सूर्याने जिंकला टॉस! मालिका विजयासाठी टीम इंडिया, तर द. आफ्रिका बरोबरीसाठी सज्ज; पाहा Playing XI

Assembly Elections: 'एम' फॅक्टरचा कौल MVAच्या बाजूने, सर्वात मोठ्या संघटनेच्या पाठिंब्यानं बळ वाढलं, महायुतीला टेन्शन

SCROLL FOR NEXT