Ajit Pawar sakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar : स्थानिक निवडणुका स्वबळावर;पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात अजित पवार यांची घोषणा

सकाळ वृत्तसेवा

पुणे : राज्यात दोन महिन्यांत विधानसभेची आचारसंहिता लागेल. ऑक्टोबरअखेर निवडणूक होईल. आम्ही लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणूकही महायुती म्हणून एकत्र लढणार आहोत, मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक आपण स्वतंत्रपणे लढणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री तसेच राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी रविवारी पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात केली.

पक्षाच्या पुणे शहर शाखेतर्फे केसरी वाड्यातील लोकमान्य सभागृहात मेळावा पार पडला. या वेळी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर, आमदार चेतन तुपे, सुनील टिंगरे, प्रदेश उपाध्यक्ष सुरेश घुले, शहराध्यक्ष दीपक मानकर, कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख आदी उपस्थित होते.

कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना अजित पवार म्हणाले, ‘‘विरोधक लोकसभा निवडणुकीच्यावेळी ‘फेक नरेटिव्ह’ पसरविण्यात यशस्वी झाले. आता सुद्धा अफवा पसरविल्या जात आहेत, मात्र त्यावर विश्वास ठेवू नका. विधानसभेसाठी आता वेळ कमी राहिला आहे. त्यामुळे आतापासूनच कामाला लागा असा माझा आदेश आहे.’’

योजना हव्या असतील तर...

अजित पवार यांनी सांगितले की, ‘समाजातील गरीब, वंचित घटकाच्या महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरु झाली आहे. यातून महिलांना दरमहा १५०० रुपये मिळतील, मात्र यावरून विरोधकांच्या पोटात गोळा उठला आहे. महायुतीचे सरकार असेपर्यंतच योजना सुरु राहतील असा खोटा प्रचार विरोधक करीत आहेत. तेव्हा या योजना बंद होणार नाहीत, मात्र या योजना हव्या असतील तर महायुतीला निवडून द्या हा संदेश कार्यकर्त्यांनी मतदारांपर्यंत पोहोचविला पाहिजे.’

अजित पवार यांचे महत्त्वाचे मुद्दे

  • - पुण्यात लवकरच कार्यकर्ता व पदाधिकाऱ्यांचा राज्यस्तरीय मेळावा

  • - जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सर्वांना बोलू दिले, तरीही सदस्यांना बोलू देत नसल्याचा खोटा प्रचार

  • - विशाळगडाच्या पायथ्याशी राहणाऱ्या लोकांना त्रास झाला, त्यांना मदत केली जाईल, मात्र राज्यात जातीय सलोखा राहिला पाहिजे

  • - लोकसभा निवडणुकीत ‘अब की बार ४०० पार’ चा नारा असताना विरोधकांकडून संविधान बदलण्याचा खोटा प्रचार

  • - चंद्र-सूर्य असेपर्यंत भारतीय संविधानाला धक्का लागणार नाही

  • - विविध योजनांसाठी राज्य सरकारचा ७५ हजार कोटी रुपयांचा खर्च

  • - पुण्यातील रिंगरोडचा प्रश्न मार्गी लावणार

  • - वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्रभावी उपाययोजना आखणार

  • - गरीब महिलांना गुलाबी रिक्षा मिळावी म्हणून जिल्हा नियोजन समितीतून निधी देणार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT