Ajit Pawar  
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar : अजित पवारांचा वाढदिवस 'अजित उत्सव' सप्ताह म्हणून होणार साजरा; तटकरेंची माहिती

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होऊन उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहे. अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे निम्म्याहून अधिक आमदार गेले आहेत. त्यातच अजित पवार यांचा २२ जुलै रोजी वाढदिवस आहे. यानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित उत्सव सप्ताह साजरा करण्यात येणार आहे.

अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितलं की, अजित पवार यांचा वाढदिवस २२ जुलै रोजी असून राष्ट्रवादीच्या वतीनं अजित उत्सव नावाने सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातला शेतकरी संकटात आहे, पेरण्या झालेल्या नाहीत, त्यामुळं प्रदर्शन न करता सामाजिक उपक्रमातून वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे.

राजकारणाची सुरुवात समाजकारण, सहकार, कला, क्रीडा, लोकसभा सदस्य, राज्यमंत्री, बँकेचे अध्यक्ष, विधानसभा सदस्य, मंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते असा प्रवास अजित पवार यांनी केला. त्यांनी नेहमीच विकासाला अधिक महत्त्व दिलं. तसेच वेळ पाळत सर्वांना न्याय दिल्याचं तटकरे यांनी नमूद केलं.

अजित पवार यांचा स्पष्टवक्तेपणा हा स्थायीभाव असून काहींना तो आवडत नसेल तरी महाराष्ट्राला तो रुचला आहे. रक्तदान शिबिर, पावसाळ्यामुळे छत्र्या वाटप, वृक्ष लागवड, शालेय साहित्य, स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान, ग्राम स्वच्छता असे सामाजिक उपक्रम २२ ते ३१ दरम्यान राबवणार असल्याचं तटकरे यांनी म्हलटं.

शरद पवार भेटीवर तटकरे म्हणाले की, शरद पवार हे आमचं दैवत आहे. तसेच दोन दिवस झालेल्या भेटीचा तपशील प्रफुल पटेल यांनी दिला आहे. आमच्या मनातल्या भावना आम्ही पवार साहेबांच्या समोर ठेवल्या.

पार्थ पवार यांच्याबाबत बोलताना तटकरे म्हणाले की, पार्थ हे राजकीय सक्रिय नसले तरी सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. येत्या काळात त्यांनी घेतलेली भूमिका ते अधिक प्रखरपणे मांडतील असा मला विश्वास असल्याचं तटकरे यांनी सांगितलं. तसेच बारसू प्रकरणात आमची भूमिका आधीपासून स्पष्ट आहे. या परिस्थितीत आम्ही सरकारशी चर्चा करू आणि शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच राज्य सरकार पावलं उचलेल, असा दावा त्यांनी केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

अग्रलेख : उघड्यावरचे वाघडे!

SCROLL FOR NEXT