Ajit Pawar Mother Esakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar Mother: अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्या आईची पहिली प्रतिक्रिया म्हणाल्या, 'अजित..'

अंकिता खाणे (Ankita Khane)

अजित पवारांना राष्ट्रवादीच्या 54 आमदारांपैकी 30 आमदारांनी पाठिंबा दिला आहे. 30 आमदार शिंदे फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. नऊ आमदारांनी रविवारी मंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार शिवसेना- भाजप सरकारमध्ये सामील झाले आहे. अजित पवार यांच्या बंडानंतर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली भूमिका मांडली आणि पुन्हा पक्षबांधणीसाठी ते राज्याच्या दौऱ्यावर गेले आहेत. (Latest Marathi News)

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार यांनी पंढरपूरला जाऊन विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतले. अजित पवार राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदी विराजमान झाल्यानंतर आशाताई पवार विठ्ठलाच्या चरणी नसमस्तक झाल्या आहेत. तर अजित पवार उपमुख्यमंत्री झाले यांचा आनंद झाला आहे, अशी प्रतिक्रिया आशाताई पवार यांनी दिली आहे.(Latest Marathi News)

अजित पवारांनी काकांच्या म्हणजेच शरद पवार यांच्या पावलावर पाऊल ठेवत राजकारणात प्रवेश केला. राष्ट्रवादी आमदारांसह बंडखोरी केली आणि राज्यात उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्या आशाताई पवार यांनी विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतले.(Latest Marathi News)

तर अजित पवार उपमुख्यमंत्री झाले याचा आनंद झाला म्हणून विठ्ठलाच्या दर्शनासाठी आल्याचे त्यांनी यावेळी म्हंटले. अजित पवारांच्या आई राजकारणापासून दूर आहेत. अजित पवारांचा जन्म 22 जुलै 1959 रोजी महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात त्यांच्या आजी-आजोबांच्या घरी झाला. अजित पवार हे शरद पवार यांचे मोठे बंधू अनंतराव पवार यांचे सुपुत्र आहेत.(Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitesh Rane: अटक टाळण्यासाठी नितेश राणेंची हायकोर्टात धाव; काय आहे प्रकरण?

हरियाना, जम्मू-काश्मीरचा निकाल, सिद्धू मुसेवालाच्या मृत्यूबाबत खळबळजनक खुलासा, वाचा आजच्या महत्त्वाच्या घडामोडी

IND vs NZ, Test: भारताविरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी न्यूझीलंड संघाची घोषणा! लॅथमकडे नेतृत्व, तर विलियम्सन उशीराने येणार

Haryana Election Results: ''हरियानामध्ये इतिहास घडला, यापूर्वी असं कधीच झालेलं नाही'' मोदींनी सांगितलं ५० वर्षांपासूनचं समीकरण

Women's T20 World Cup: हरमनप्रीत कौर उद्याचा सामना मुकणार? स्मृती मानधनाचं मोठं विधान; नेट रन रेटचं गणितही सांगितले

SCROLL FOR NEXT