Akola Lok Sabha 2024 Election Results:  sakal
महाराष्ट्र बातम्या

Akola Lok Sabha 2024 Election: अकोल्यात प्रकाश आंबेडकर पिछाडीवर, भाजपलाही धक्का

Akola lok sabha election 2024 winners list: भाजपाचे खा. संजय धोत्रे यांनी अकोला लोकसभेचा गड कायम ठेवण्यात यश मिळवले होते

योगेश फरपट

Akola News: अकोला लोकसभा मतदारसंघात पहिल्या फेरीपासूनच महाविकास आघाडीचे डॉ. अभय पाटील हे आघाडीवर असल्याचे दिसून येते. सातव्या फेरी अखेर डॉक्टर अभय पाटील यांना एक लाख 27,493 मते मिळाली असून भाजपचे अनुप धोत्रे  यांना 1,13,292 एवढी मते मिळाली आहे. तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार एडवोकेट प्रकाश आंबेडकर यांना 81,188 एवढी मते मिळाली असून आतापर्यंत सहाव्या फेरी अखेर 46,305 मतांनी आंबेडकर पिछाडीवर आहेत.  

अकोला लोकसभा मतदारसंघ हा राज्यातील राजकारणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा मतदारसंघ मानला जातो. 2004, 2009, 2014, 2019 अशा चार निवडणूकांमध्ये दणदणीत विजय मिळवत भाजपाचे खा. संजय धोत्रे यांनी अकोला लोकसभेचा गड कायम ठेवण्यात यश मिळवले होते. (Akola Lok Sabha Election 2024 Highlights)

त्यांचे सुपूत्र अनुप धोत्रे व डॉक्टर अभय पाटील व अडवोकेट प्रकाश आंबेडकर यांच्या तिहेरी लढत अकोल्यात पहायला मिळत आहे. प्रकाश आंबेडकरांना निवडणूकीचा चांगला अनुभव आहे. त्यातुलनेत इतर दोन्ही उमेदवार पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहेत. 

वंचित चे आंबेडकर पिछाडीवर!

अकोला लोकसभा मतदार संघात १९८४ पासून झालेल्या १० लोकसभा  निवडणूकीत ॲड. आंबेडकर निवडणूक रिंगणात होते. तिरंगी लढतीत त्यांना आठ वेळा पराभवाचा सामना करावा लागला. १९९८ व १९९९ मध्ये काँग्रेसच्या पाठींब्यावर ॲड. आंबेडकर विजयी झाले होते. सरळ लढतीत १९९८ साली आंबेडकर केवळ ३२,७८२ एवढ्या कमी मताधिक्याने विजयी झाले होते.

त्यावेळी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी अकोल्यात मुक्कामी थांबून सहकार लॉबीला तंबी देत आंबेडकरांना विजयी करण्याचा दम दिल्याने आंबेडकर विजयी होवू शकले. त्यानंतर १९९९ च्या  निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक रिंगणात होता. या पक्षातर्फे अकोल्यात डॉ. संतोष कोरपे हे मराठा पाटील समाजाचे उमेदवार होते. त्यांना १,२३,६४० मते मिळाल्याने बहुतांश भाजपाचीच मते कमी झाली. तरी सुध्दा अॅड. आंबेडकर केवळ ८,७१६ एवढ्या कमी मताधिक्याने विजयी झाले होत.

१९८४ पासून झालेल्या निवडणूकीत ज्यावेळी काँग्रेसतर्फे मराठा पाटील उमेदवार रिंगणात होता त्यावेळी ॲड. आंबेडकर विजयाच्या जवळ गेले वा विजयी झाल्याचा इतिहास आहे. १९८४ च्या निवडणूकीत काँग्रेसचे मधुसूदन वैराळे यांना १,७८,८७४ तर प्रकाश आंबेडकरांना १,६५,०६४ मते मिळालीत.

आंबेडकरांचा केवळ १३,८१० मतांनी पराभव झाला. १९९६ च्या निवडणूकीत काँग्रेसने परत मराठा पाटील समाजाचे डॉ. संतोष कोरपे यांना उमेदवारी दिली होती. यावेळी ॲड. आंबेडकरांचा केवळ ९,०५३ मतांनी पराभव झाला होता. यंदाच्या निवडणुकीत सातव्या फेरी अखेर 46 हजार 305 मतांनी पिछाडीवर असल्याचे  मतदानाच्या आकडेवारीवरून दिसून येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT