महाराष्ट्र बातम्या

Akshay Shinde Encounter: अक्षय शिंदेला पोलिस नेमकं कुठे घेऊन जात होते? गृहमंत्री फडणवीसांनी सांगितला घटनाक्रम

संतोष कानडे

Badlapur School Crime News: बदलापूर येथील एका शाळेमध्ये दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचाराची घटना घडली होती. या प्रकरणानंतर बदलापूरमध्ये जनक्षोभ उसळला होता. आरोपीला फाशीची शिक्षा द्या, या मागणीसाठी रेल रोको आंदोलन झालं.

बदलापूर प्रकरणामध्ये अक्षय शिंदेंच्या कोर्टासमोर सुनावण्या सुरु होत्या. सोमवारी त्याचा एन्काऊंटर झाल्याची बातमी येऊन धडकली आहे. सुरुवातीला त्याने स्वतःवर गोळ्या झाडत आत्महत्या केल्याचं सांगितलं गेलं. त्यानंतर मात्र पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी आरोपी अक्षयवर गोळ्या झाडल्याचं स्पष्ट झालेलं आहे.

या प्रकरणी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, आरोपीच्या पूर्व पत्नीने त्याच्यावर लैंगिक अत्याचाराची तक्रार केली होती. त्यामुळे चौकशीसाठी वॉरंट घेऊन त्याला नेलं जात होतं. त्याचवेळी अक्षयने पोलिसांची बंदूक हिसकावून पोलिसांवर आणि हवेमध्ये फायरिंग केलं.

फडणवीस पुढे म्हणाले, अक्षयने बंदुकीतून फायरिंग केल्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ त्याच्यावर गोळ्या झाडल्या. त्याला रुग्णालयात नेण्यात आलेलं असून त्याच्या मृत्यूची अधिकृत घोषणा झालेली नाही. पोलिसांनी केलेला गोळीबार हा स्वसंरक्षणार्थ होता, अशी प्राथमिक माहिती आहे.

विरोधकांनी एन्काऊंटरवरुन प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यावर बोलताना फडणवीस म्हणाले, विरोधक तर आरोपीला फाशी द्या म्हणत होते. त्याच आरोपीने पोलिसांवर गोळीबार केला. त्यामुळे पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ गोळी झाडली आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस करीत आहेत.

नेमकं आत्तापर्यंत काय घडलं?

  • बदलापूर येथील एका नामांकित शाळेत शिकणाऱ्या दोन ४ वर्षांच्या मुलींवर २३ वर्षीय पुरुष सफाई कर्मचाऱ्याने मुलींच्या शौचालयात लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे

  • या दोन चिमुरड्यांवर १२ - १३ ऑगस्ट २०२४ रोजी दोन लैंगिक आत्याचार झाले.

  • शाळेकडून मुलींच्या टॉयलेटजवळ महिला कर्मचाऱ्याची नेमणूक करण्यात आलेली नव्हती.

  • या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याची १ ऑगस्ट २०२४ रोजी काँट्रॅक्ट वर नेमणूक करण्यात आली होती.

  • आरोपीकडे शाळेतील मुलींचे टॉयलेट साफ करण्याची जबाबदारी देण्यात आली होती.

  • शनिवारी रात्री मुलींच्या पालकांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली.

  • एका मुलीने तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये दुखत असल्याची तक्रार केल्यानंतर हे सर्व प्रकरण उजेडात आले.

  • या मुलीच्या पालकांनी तिच्या सोबत राहणाऱ्या मुलीच्या पालकांशी संपर्क केल्यावर त्यांनी देखील त्यांची मुलगी काही दिवसांपासून शाळेत जाण्याबद्दल घाबरलेली असते असे सांगितले.

  • यानंतर पालकांनी त्यांच्या मुलींची डॉक्टरांकडून वैद्यकीय तपासणी केल्यानंतर लैंगिक अत्याचार झाल्याचे समोर आले.

  • यानंतर बदलापूर पूर्व पोलिस स्टेशनमध्ये शुक्रवारी रात्री गुन्हा नोंदवण्यात आला, यावेळी पोलिसांनी गु्न्हा नोंदवून घेण्यास दिरंगाई केल्याचा आरोप देखील केला जात आहे.

  • सोमवार, दि. २३ सप्टेंबर रोजी अक्षय शिंदेचा पोलिसांनी एन्काऊंटर केला आहे. त्याने पोलिसांची बंदूक हिसकावून त्यांच्यावर गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी गोळीबार केला, अशी प्राथमिक माहिती आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गाडी मुंब्रा बायपासवर आली, तेव्हाच अक्षयने बंदूक खेचली अन्... अखेर पोलिसांनी घटनाक्रम सांगितला!

अक्षयला कायद्याच्या योग्य चौकटीतून फाशी व्हायला हवी होती; गृह विभागाचा हलगर्जीपणा संशयास्पद, शरद पवारांची प्रतिक्रिया

आरोपी Akshay Shinde याच्या मृत्यूमागे रश्मी शुल्कांचा हात, नाना पटोलेंचा खळबळजनक आरोप

Akshay Shinde Encounter: ''स्वसंरक्षण की हत्या?'' अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर उपस्थित होताएत 'हे' प्रश्न; न्यायमूर्तींमार्फत चौकशीची मागणी

Akshay Shinde Encounter: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर वेळी नक्की काय घडलं? पोलिसांवर का व्यक्त केला जातोय संशय? वाचा इनसाईड स्टोरी

SCROLL FOR NEXT