amides Power Crisis mahanirmiti is capable of tackling power shortages  Sakal
महाराष्ट्र बातम्या

Power Crisis: महानिर्मिती राज्यातील वीज टंचाईचे आव्हान पेलणार

एकीकडे जगभरात कोळसा तुटवड्यामुळे अंधारात जाण्याची स्थिती निर्माण झाली असताना राज्यातील महानिर्मिती कंपनी समर्थपणे तोंड देत आहे.

निलेश छाजेड

एकलहरे (जि. नाशिक) : एकीकडे जगभरात कोळसा तुटवड्यामुळे अंधारात जाण्याची स्थिती निर्माण झाली असताना राज्यातील महानिर्मिती कंपनी समर्थपणे तोंड देत आहे. महानिर्मितीच्या विद्युत केंद्रांची एकूण स्थापित क्षमता १२,९७२ मेगावॉट असून निव्वळ औष्णिक वीजनिर्मिती व त्याचबरोबर जल व वायु विद्युतनिर्मिती मिळून सरासरी ८ हजार ५० मेगावॉटची निर्मिती सुरू आहे.

सध्या सगळीकडे कोळसासाठ्याबाबत चिंता व्यक्त केली जात असताना वीजनिर्मिती ठप्प होते की काय अशी शंका व्यक्त होत असताना महानिर्मिती राज्याच्या विजेची गरज भागविण्यास पूर्णपणे सज्ज आहे. त्यासाठी सरासरी सहा हजार ते आठ हजार मेगावॉट वीज निर्मिती करून महावितरण कंपनीस साहाय्य करीत आहे.

महानिर्मितीकडे सध्या सरासरी २ दिवसांइतका कोळसा साठा उपलब्ध आहे. मात्र ४ ऑक्टोबर २०२( पासून कोळसा पुरवठ्यात सुधारणा झालेली असून सरासरी दररोज ९० हजार ते एक लाख मेट्रिक टन इतक्या कोळशाची आवक सुरू आहे. १० ऑक्टोबर रोजी कोळशाच्या साठ्यामध्ये वृद्धी होऊन तो १.९१ लक्ष टन इतका झाल्यामुळे महानिर्मितीच्या औष्णिक विद्युत केंद्रांतून होणारी वीजनिर्मिती १२५ मिलियन युनिट्स (५२०० मेगावॉट) पर्यंत वाढविण्यात आलेली आहे. पावसाळ्यातील गरज भागविण्यासाठी उपाययोजनेचा भाग म्हणून दरवर्षी कोळशाचा साठा करण्यात येतो. यावर्षी महार्निर्मितीच्या सर्व वीज केंद्रातील कोळशाचा साठा जुलै महिन्यात १८.११ लक्ष टन एवढा होता. हा साठा मागील ३ वर्षांच्या सरासरी (१५ लक्ष टन) पेक्षा जास्त होता. दरवर्षी ऑगस्ट महिन्यात महानिर्मितीकडून सरासरी ३ हजार मिलियन युनिट्स वीजपुरवठा करण्यात येतो. परंतु या वर्षी ऑगस्ट महिन्यात विजेची मागणी अचानक वाढल्यामुळे ४ हजार तिनशे मिलियन युनिट्स विजेचा पुरवठा करण्यात आला. परिणामी, महानिर्मितीच्या कोळसाच्या साठ्यात लक्षणीय घट झाली (एक ऑगस्ट रोजी १४.११ लक्ष टन, ३१ ऑगस्ट रोजी ३.७१ लक्ष टन) आहे.

दृष्टीक्षेपात
* पावसाळ्यात कोळशाचा पुरवठा कमी होतो.
* यंदा ऑगस्ट महिन्यात मागणी वाढल्यामुळे कोळसा वापर जास्त झाल्याने कोळसा तुटवडा
* ३ ऑक्टोबर पर्यंत १.३५ लक्ष टन कोळसा पुरवठा
* पावसाळा संपल्यावर कोळसा पुरवठ्यात सुधारणा
* बंद संच टप्प्या टप्प्याने सुरू करण्यात येणार

वीज केंद्र आजची निर्मिती
औष्णिक : ५८२० मेगावॉट
जल विद्युत : १९७८ मेगावॉट
वायू विद्युत : २३२ मेगावॉट
आज सायंकाळी ७ वाजता राज्याची मागणी २०, ८५८ मेगावॉट तर सर्व स्रोतांतून वीजनिर्मिती १४,२८० मेगावॉट
उर्वरित ६, ५५० मेगावॉट सेंट्रल काढून घेऊन गरज भागविली जात आहे.

चार विद्युत संच बंद

सद्यःस्थितीत कोळसा वापराचे नियोजन केल्यामुळे महानिर्मितीचे ४ विद्युत संच बंद ठेवण्यात आलेले आहेत. यात चंद्रपूर, भुसावळ व पारस येथील संचांचा समावेश आहे. सप्टेंबर २०२१ मध्ये संपूर्ण महिनाभर महानिर्मितीने सरासरी चार हजार ५०० मेगावॉट इतकी वीजनिर्मिती साध्य केली. पुढील आठवड्यात कोळसा पुरवठा पूर्ववत होऊन वीजनिर्मिती सामान्य स्तरावर येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अंधेरी पूर्व विधानसभेत मुर्जी पटेल आघाडीवर

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

Sanjay Raut : हा जनतेचा कौल नसून, लावून घेतलेला निकाल; संजय राऊतांचा रोख कोणाकडे?

Amit Thackeray Maharashtra Assembly Election : अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीत उतरले अन् तिरंगी लढतीच्या चक्रव्यूहात अडकले; ठाकरे ब्रँडचं काय होणार?

SCROLL FOR NEXT