कर्नाटकातील विरोधी पक्षनेत्याच्या निवडीसाठी केद्रिंय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे आणि मंत्री मनसुख मंडवीय यांची केंद्रीय निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.
कर्नाटकात विरोधी पक्षनेते कोण होणार याबाबत भाजप लवकरच आपले पत्ते उघडू शकते. रविवारी रात्री उशिरा दिल्लीत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यात बैठक झाली. या बैठकीमध्ये नेत्याची निवड करण्यासाठी कर्नाटक भाजप विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत केंद्रीय निरीक्षक म्हणून केंद्रीय मंत्री मनसुख आणि विनोद तावडे यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला. मांडविया आणि पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांना बेंगळुरूला पाठवण्यात येणार आहे.(Latest Marathi News)
या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी नड्डा रविवारी रात्री अमित शाह यांच्या निवासस्थानी पोहोचले. मनसुख मांडविया आणि विनोद तावडे हे दोन्ही नेते आज सोमवारी कर्नाटकातील विरोधी पक्षनेते म्हणजेच कर्नाटक विधानसभेतील भाजप विधिमंडळ पक्षाच्या नेत्याची निवड करण्यासाठी बेंगळुरूला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.(Latest Marathi News)
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी जेपी नड्डा आणि अमित शहा यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर पक्षाच्या हायकमांडने दोन केंद्रीय निरीक्षकांना राज्यात पाठवण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे. जेपी नड्डा यांनी रविवारीच येडियुरप्पा यांना दिल्लीत बोलावले होते. कर्नाटकात निवडणूक हरल्यानंतरही विधानसभेतील भाजप विधिमंडळ पक्षाचा नेता कोण यावरून पक्षात अंतर्गत कलह सुरू असल्याच्या चर्चा आहेत.(Latest Marathi News)
अशातच राज्याचे माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई सध्या या यादीत आघाडीवर आहेत. मात्र पक्षातील इतर अनेक दिग्गज नेतेही या पदासाठी आपापल्या परीने दावा करत आहेत. त्यामुळेच कर्नाटकात विरोधी पक्षनेते निवडीला इतका विलंब झाला आहे.(Latest Marathi News)
विलंबाचे आणखी एक कारण असे सांगितले जात आहे की, विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुका लक्षात घेता पक्षाला कर्नाटकमध्ये कोणतीही जोखीम पत्करायची नाही. कारण 2024ला लोकसभा निवडणुका आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.