मुंबई : एकनाथ शिंदे गटाला सोबत घेऊन महाराष्ट्रात सरकार स्थापन करून उद्धव ठाकरेंना दणका देणारा भाजप अजूनही आपला प्रचार थांबवण्याच्या मनस्थितीत नाही. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकांच्या पार्श्वभूमिवर आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे मुंबई दौऱ्यावर होते.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज दिवसभर मुंबई दौऱ्यावर होते, अगदी सकाळपासून सुरू झालेल्या दौऱ्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर आणि संध्याकाळी मुंबई विमानतळावर भाजपची महत्वाची बैठक झाली. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून नाराज असणाऱ्या पंकजा मुंडे मात्र या अमित शहांच्या मुंबई दौऱ्यातून गायब असल्याचे चित्र पाहायला मिळाले.
अमित शहांच्या मुंबई दौऱ्यात मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकांसंबंधीची रणनीती ठरवली जाईल असे बोलले जात होते, दरम्यान अमित शहा यांच्या उपस्थितीत झालेल्या कोर कमिटीच्या बैठकीला देखील पंकजा मुंडे गैरहजर होत्या, यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.
अमित शाह हे मुंबईहून दिल्लीला रवाना होण्याआधी, विमानतळावर भाजपच्या कोअर कमिटीची बैठक झाली या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह भाजपचे नेते चंद्रकांतदादा पाटील, पूनम महाजन, सुधीर मुनगंटीवार, प्रविण दरेकर, संभाजीराव निलंगेकर, आशिष शेलार, अतुल भातखळकर, अतुल सावे, विनोद तावडे हे नेते हजेरी लावणार होते. मात्र पंकजा मुंडे या मात्र परळीत असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयाकडून देण्यात आली.
पंकजा मुंडे कुठे होत्या?
भाजपच्या कोअर कमिटीची बैठकीत मुंबई महापालिका निवडणुकांसाठी रणनिती ठरवण्यात येत होती, तेव्हा पंकजा मुंडे परळीमध्ये होत्या. त्यांनी गौरी गणपती स्पर्धेच्या निमित्ताने पंकजा मुंडे यांनी आज परळी शहरातील घरोघरी जाऊन गौरी गणपतीचे दर्शन घेतले. राज्यात मविआ सरकार कोसळल्यानंतर शिंदे फडणवीसांचे सरकार स्थापन झाले मात्र पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळालं नाही त्यावरून त्यांच्या नाराजीच्या चर्चा सुरू होत्या, त्यानंतर पंकजा मुंडे आजही कोअर कमिटीच्या बैठकीपासून दूर राहिल्याचे समोर आल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.