Amol Kolhe big statement Next Chief Minister Jayant Patil NCP politics Ajit Pawar 
महाराष्ट्र बातम्या

CM पदावरुन राष्ट्रवादीत घमासान; आता अमोल कोल्हे म्हणतायत जयंत पाटील...

राजकीय वर्तुळात राष्ट्रवादी फूटीची चर्चा

धनश्री ओतारी

राज्यात गेल्या काही दिवसांपासून घडामोडींना वेग आला आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांना भावी मुख्यमंत्री म्हणून धारशिव, नागपूर आणि आता उल्हासनगर येथे बॅनर झळकले आहेत. अशातच खासदार अमोल कोल्हे यांनी जयंत पाटील हेच भावी मुख्यमंत्री असतील. अस स्पष्ट केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात राष्ट्रवादी फूटीची चर्चा अधिक रंगली आहे. (Amol Kolhe big statement Next Chief Minister Jayant Patil NCP politics Ajit Pawar)

अमोल कोल्हे बुधवारी सांगली दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी जयंत पाटील यांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री असा केला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजितदादा विरुद्ध जयंत पाटील यांच्यातील सुप्त संघर्ष स्पष्टपणे दिसून आला.

Types of Vedas: वेदांचे प्रकार

जयंत पाटील यांच्यासारख्या सुशिक्षित व सुसंस्कृत नेत्याची राज्याला मुख्यमंत्री म्हणून गरज आहे. राष्ट्रवादी काँग्रेसजवळ जयंत पाटलांच्या ताकदीचा दुसरा उमेदवार नाही. अस वक्तव्य कोल्हे यांनी केलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री पदावरुन राष्ट्रवादीत घमासान माजले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमधील दिग्गज नेत्यांच्या परस्परविरोधी वक्तव्याने राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशातच काल युवा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना शरद पवार यांनी आता भाकरी फिरवण्याची वेळ आली आहे. आता विलंब करून चालणार नाही. असं सूचक असं सूचक विधान केलं आहे. त्यामुळे अजित पवारांच्या हालचालींकडे राज्याचे लक्ष राहणार आहे.

अजित पवार यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ते भाजपसोबत जाणार काय, अशी चर्चा रंगत असताना नागपूर, त्यांची सासरवाडी धारशिव आणि उल्हासनगर तसेच पुणे या ठिकाणी अजित पवारांच्या समर्थनात बॅनरबाजी सुरू झाली आहे.

या बॅनरवर ‘वचनाचा पक्का, हुकमाचा एक्का, मुख्यमंत्रिपदासाठी अजितदादाच पक्का’ असा मजकूर लिहिलेला असून राष्ट्रवादीचे नेते प्रशांत पवार यांनी हे बॅनर लावले आहे. नागपुरातील लक्ष्मीभुवन चौक, बर्डीसह इतर परिसरात हे बॅनर लावण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: 17 तारखेला शिवाजी पार्कवर राज ठाकरेंची तोफ धडाडणार नाही, ठाकरेंनीच सांगितले सभा रद्द होण्याचे 'हे' कारण

Latest Maharashtra News Updates : पुण्यातील हडपसरमध्ये इमारतीला भीषण आग

Winter Skincare: हिवाळ्यात त्वचा सतत कोरडी आणि निस्तेज वाटते? मग हे ६ उपाय वापरून घेऊ शकता तुमच्या त्वचेची काळजी

Instagram Reels: इंस्टाग्राम रील्सवर 1 मिलियन व्ह्यूजसाठी किती पैसे मिळतात? रक्कम जाणून तुम्हीही व्हाल थक्क

दारूच्या नशेतच कपूर परिवाराला पहिल्यांदा भेटली संजय कपूरची बायको ; म्हणाली "ड्रिंक्स करताना त्याने प्रपोज केलं"

SCROLL FOR NEXT