Amol Mitkari सकाळ डिजिटल टीम
महाराष्ट्र बातम्या

गोव्याचा आनंद साजरा करणाऱ्या भाजपची मिटकरींनी केली पोर्तुगीजांशी तुलना

गोव्यातील विजयानंतर फडणीस आज नागपुरात आले आहेत. यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांकडून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.

सकाळ डिजिटल टीम

गोव्यात मिळालेल्या विजयानंतर नागपुरात भाजपचे शक्तीप्रदर्शन पाहायला मिळाले. आज देवेंद्र फडणवीसांचं नागपूरात जंगी स्वागत करण्यात आलं. नागपूर विमानतळ ते केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या घरापर्यंत रॅली काढत नागपूरात जोरदार सेलिब्रेशन करण्यात आलं. या जंगी रोड शो तसंच सेलिब्रेशनवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी टीका केली. मिटकरी यांनी ट्वीट करत भाजपवर टीकास्त्रे सोडले.

अमोल मिटकरी ट्वीटद्वारे म्हणाले, “पोर्तुगीजांनी गोवा जिंकून महाराष्ट्रात आनंद साजरा करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांचा महाराष्ट्र जिंकायचा इरादा कधी सफल झाला नाही कारण इकडे जंजिरा, सिंधुदुर्ग असे अनेक जलदुर्ग व मजबूत आरमार "छत्रपती शिवाजी महाराजांनी" निर्माण करुन ठेवले होते. #रोडशो”

गोव्यातील विजयानंतर फडणवीस आज नागपुरात आले आहेत. यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांकडून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी ते म्हणाले, जनतेच्या आशीर्वादामुळे हे यश मिळालं. हा जनतेचा कौल आहे. राष्ट्रीय स्तरावर काम केलं की जबाबदारी बदलते. त्यावेळी सिद्धतेचं आव्हान असतं. नागपुरकांना केलेला हा सत्कार मी पंतप्रधान मोदी आणि गोव्याच्या जनतेकडून स्वीकारतो आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं. तुमचं पुढचं मिशन काय ? या प्रश्नावर ते म्हणाले, आमचं मिशन भाजप देईल तेच, आमचं मिशन एकच जनतेचं कल्याण, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.

पुढे ते म्हणाले, सरकार पडतील अशा संदर्भातील चर्चा मला करायची नाही कारण त्यावर पुन्हा वाद निर्माण होतात. ज्या दिवशी राज्यात निवडणुका लागतील मग त्या कोणत्याही असतील महापालिका, जिल्हापरिषद सगळीकडे भाजपाचा झेंडा लागणार आहे, असेही त्यांनी सांगितले आहे. २०२४ ला महाराष्ट्रात स्वबळावर सत्ता काबीज करणार बहुमत असेललं सरकार भाजपचं असेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. ज्या दिवशी महाराष्ट्रात निवडणुका लागतील त्यादिवसापासून भाजप एक नंबरचा पक्ष असेल असंही ते म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT