Amol Mitkari सकाळ डिजिटल टीम
महाराष्ट्र बातम्या

मलिक व देशमुख यांच्यावर अद्याप आरोप सिद्ध झालेले नसताना... : अमोल मिटकरी

लोकशाहीत मताधिकाराला महत्त्व आहे. दोघांनाही न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : राज्यातील राज्यसभेच्या सहा जागांसाठी उद्या शुक्रवारी (ता.दहा) मतदान होत आहे. त्यासाठी महाविकास आघाडीकडून संख्याबळ जमवण्यासाठी जुळवा-जुळव सुरु आहे. त्यातच आघाडीला एक झटका बसला आहे. अटकेत असलेल्या माजी गृहमंत्री अनिल देशमुख व मंत्री नबाव मलिक यांनी राज्यसभेच्या मतदानासाठी न्यायालयात परवानगी मागितली होती. मात्र सत्र न्यायालयाने परवानगी नाकारली आहे. न्यायालयाच्या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी ट्विट करुन नापसंती व्यक्त केली आहे. (Amol Mitkari Express His Disappointment Over Court Judgment On Anil Deshmukh And Nawab Malik)

मिटकरी म्हणतात, नवाब मलिक (Nawab Malik) साहेब व अनिल देशमुख (Anil Deshmukh) साहेब यांच्यावर अद्याप आरोप सिद्ध झालेले नसताना सुद्धा त्यांना मताधिकार नाकारणे ही संविधानाची पायमल्ली ठरत नाही का? जो निकाल आलाय तो आश्चर्यकारक आहे, अशी प्रतिक्रिया अमोल मिटकरी यांनी दिली आहे. संविधानिक अधिकार कुणालाही हिराऊन घेता येत नाहीत. लोकशाहीत मताधिकाराला महत्त्व आहे. दोघांनाही न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे, असा आशावाद अमोल मिटकरी यांनी व्यक्त केला. (Rajya Sabha Election 2022)

अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्या मागणीला सक्तवसुली संचालनालयाने (ED) विरोध केला. कैद्यांना मतदानाचा अधिकारच नसल्याचा ईडीने न्यायालयात सांगितले होते. त्यावरुन सत्र न्यायालयाने मतदानाची परवानगी नाकारली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Gold Investment : महिला आणि संपत्ती: तरुणींमध्ये सोन्यात गुंतवणूक करण्याचा वाढता कल

सुखविंदर सिंग आणि पुण्याचं आहे खास कनेक्शन, म्हणतात- इथे आलो की कधीच गाडीने फिरत नाही कारण...

Latur Assembly Election 2024 : देशमुख विरुद्ध चाकूरकरांमध्ये सरळ लढत, लातूर शहर मतदारसंघात २३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

Latest Marathi News Updates live : इतरांकडे असलेल्या चांगल्या गोष्टी पंतप्रधानांना दिसत नाहीत- खर्गे

SCROLL FOR NEXT