नवी दिल्ली : महाराष्ट्रातील अमरावती येथे पशुवैद्यकीय रसायनशास्त्रज्ञ उमेश प्रल्हादराव कोल्हे यांच्या हत्येशी संबंधित प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) शुक्रवारी आरोपपत्र दाखल केले आहे. भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी पैगंबरांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या समर्थनार्थ कोल्हे यांच्या सोशल मीडिया पोस्टच्या विरोधात सूड उगवण्याचे कृत्य म्हणून ही हत्या झाल्याचे आरोपात म्हटलं आहे. (Nupur Sharma news in Marathi)
आरोपपत्रात नाव असलेल्या ११ आरोपींमध्ये मुदस्सिर अहमद, शाहरुख खा, अब्दुल तौफीक शेख, मोहम्मद शोएब, अतिब रशीद, युसूफ खान, इरफान खान, अब्दुल अरबाझ, मुशिफिक अहमद, शेख शकील आणि शाहीम अहेमद हे आहेत. हे अमरावतीचे रहिवासी आहेत.
भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी पैगंबरांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या समर्थनार्थ उमेश कोल्हे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. त्याचा मनात राग धरूनच कोल्हे यांना ठार केल्याचं आरोपत्रात नमूद करण्यात आलं आहे.
हेही वाचा काय आहे सलाम किंवा कुर्निसाताचे महत्त्व राजशिष्टाचारांमध्ये
एनआयएने शुक्रवारी सांगितले की, त्याच्या तपासात असे दिसून आले आहे की आरोपींनी हल्ला करण्यासाठी दहशतवादी टोळी तयार करून गुन्हेगारी कट रचला होता. आरोपींवर आयपीसीच्या कलम 120 बी, 341, 302, 153-ए, 201, 118, 505, 506, 34 आणि बेकायदेशीर क्रियाकलाप प्रतिबंध अधिनियम १९६७ च्या कलम 16, 17 18, 19 आणि 20 अन्वये आरोपत्र दाखल करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.