मुंबई : पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी भाष्य केलं आहे. या अपघातातील आरोपीला कठोर शिक्षा व्हायला हवी अशी मागणी करताना या अल्पवयीन आरोपीला लगेचच जामीन मंजूर झाल्याप्रकरणी बाल न्याय मंडळावर त्यांनी तोंडसुख घेतलं आहे. (Amruta Fadnavis comment on Pune Porsche Accident Kalyani Nagar Accident)
काय म्हणाल्या अमृता फडणवीस?
अमृता फडणवीस यांनी ट्विट करुन आपल्या मनातील खदखद व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटलं की, पुण्यातील अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या अनिश अवधिया आणि आश्विनी कोष्टा यांच्या कुटुंबियांप्रती माझ्या सहवेदना आहेत. पण यातील प्रमुख आरोपीला कठोर शिक्षा व्हायला हवी. बाल न्याय मंडळानं त्याला दिलेला जामीन हा लाजीरवाणा निकाल आहे.
पुण्यात काय घडलं?
पुण्यातील कल्याणीनगर भागात १९ मे रोजी मध्यरात्री अडीच वाजता एका आलिशान भरधाव पोर्शे कारनं धडक दिल्यानं दुचाकीवरील दोन इंजिनिअर तरुणांचा जागीच मृत्यू झाला होता. या थरकाप उडवणाऱ्या घटनेनं राज्यच नव्हे तर देश हादरला आहे. याप्रकरणाच्या तपासात पुढे अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. आरोपी हा अल्पवयीन असून त्यानं पबमध्ये मद्यपान केल्यानंतर कार चालवायला घेतली होती.
विशेष म्हणजे हा अल्पवयीन आरोपी पुण्यातील एका बड्या बिल्डरचा मुलगा आहे. याप्रकरणी अल्पवयीन मुलावर विविध गुन्हे दाखल करण्यात आले असून यावर बाल न्याय मंडळासमोर सुनावणी सुरु आहे. तसेच या आरोपीच्या वडिलांना पुणे पोलिसांनी संभाजीनगर इथून अटकही केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.