मुंबई : शिवसैनिकांनी माझ्यावर हल्ला केल्याचा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya Shivsena Attack Pune) यांनी केला. शिवसैनिकांसोबत झालेल्या झटापटीनंतर सोमय्या पुणे महापालिकेच्या पायऱ्यांवरून खाली कोसळले. यामध्ये त्यांना गंभीर दुखापत झाली. यावरूनच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता (Amruta Fadnavis) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर (Maharashtra CM Uddhav Thackeray) निशाणा साधला आहे.
किरीट सोमय्यांनी केलेल्या ट्विटला रिट्विट करत अमृता फडणवीसांनी हिंदीतील काही ओळी पोस्ट केल्या आहेत. यावरून त्यांनी सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीला दिलेली परवानगी, मुंबईतील वाहतूक कोंडी, शंभर कोटी वसुली प्रकरण आणि किरीट सोमय्यांवर झालेल्या हल्ल्याचा उल्लेख केला आहे. तसेच तुम्ही किती स्वार्थी झालेत? असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना विचारला आहे. स्वतःचे धंदे लपविण्यासाठी सत्याला मारलं जातं, असा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे.
अमृता फडणवीसांचं ट्विट नेमकं काय? -
''कभी वाइन ने मारा,
कभी ट्रैफ़िक congestion ने मारा,
कभी वसूली ने मारा,
कभी तेरे goon ने मारा,
ऐ चौपट राजा कैसी तेरी ख़ुदगर्ज़ी,
अपने ऐब छुपाने के लिए,
सच्चाई को तूने चुन चुनके मारा!'', अशा हिंदी ओळी अमृता यांनी ट्विट केल्या आहेत.
नेमकं काय घडलं? -
किरीट सोमय्या पुणे महापालिकेत आयुक्त विक्रमकुमार यांना निवेदन देण्यासाठी येणार असल्याची कुणकुण शिवसैनिकांना लागली होती. जवळपास 100 शिवसैनिक महापालिकेच्या आवारात आधीपासून उपस्थितीत होते. सोमय्या यांची गाडी जुन्या इमारतीच्या दिशेने आली. यावेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. नव्या इमारतीकडून अन्य शिवसैनिकांनी घोषणाबाजी करत सोमय्यांना घेराव घातला. यावेळी शिवसैनिकांसोबत झटापट झाली. त्यानंतर किरीट सोमय्या महापालिकेच्या पायऱ्यांवरून खाली कोसळले. त्यानंतर त्यांना संचेती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.