Amruta Fadnavis Video On mazi ladki bahin yojana 2024  
महाराष्ट्र बातम्या

Amruta Fadnavis Video : "ओ मामी बरं झालं तुम्ही..."; 'लाडकी बहीण'च्या प्रचारासाठी अमृता फडणवीसांनी बनवली रील, एकदा पाहाच

रोहित कणसे

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्या सरकारच्या लाडकी बहीण योजनेची जोरदार चर्चा आहे. नुकतेच या योजनेचा तिसरा हप्ता लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरूवात झाली आहे. यादरम्यान लाडकी बहीण योजनेसंबंधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये अमृता फडणवीस रीलच्या माध्यमातून राज्य सरकारच्या 'माझी लाडकी बहीण' योजनेचा प्रचार करताना दिसत आहेत.

हा व्हिडीओ ऋतू रामटेके नावाच्या यूजरच्या इंस्टाग्रामवर अकाऊंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. ज्यावर लाडकी बहीण योजना Ft. फडणवीस मामी असं लिहिल्याचे दिसत आहे. या व्हिडीओमध्ये अमृता फडणवीस या एका महिलेला तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे आले का? असे विचारताना दिसत आहेत. तर पुढे एक तरुण "ओ मामी बरं झालं तुम्ही मामांना सांगितलं आणि लाडकी बहीण योजनेचे पैसे आले, गल्लीतील सगळ्या बायकांचे पैसे आले... ''असे म्हणताना दिसत आहे.

या व्हिडीओच्या शेवटी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना हे गाणे देखील वाजताना ऐकू येत आहे. या रीलला अडीच हजारांपेक्षा अधिक लोकांनी लाइक केले असून मोठ्या नेटकरी मोठ्या प्रमाणात कमेंट्स देखील करत आहेत.

लाडकी बहीणचा तिसरा हप्ता जमा होण्यास सुरूवात

लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्य सरकारकडून लाभार्थी महिलांना दर महिना दीड हजार रुपये दिले जात आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभ हस्तांतरणाच्या तिसऱ्या टप्प्यात सुरुवात झाली असून दिनांक २९ सप्टेंबर रोजी ३४,७४,११६ भगिनींना ५२१ कोटी रुपयांचा लाभ हस्तांतरण करण्यात आल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली होती. तसेच उर्वरित महिलांना लाभ हस्तांतरण करण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरु असल्याचे देखील तटकरे यांनी सांगितले होते. ज्या भगिनींना आधी लाभ मिळाला होता त्यांना तीसरा हफ्ता आणि ज्यांना आधी तांत्रिक अडचणींमुळे लाभ मिळाला नव्हता त्यांना यावेळेस तिन्ही हफ्ते एकत्र देण्यात आले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sai Baba: वाराणसीतल्या मंदिरांमधून साई बाबांच्या मूर्ती हटवल्या अन् गंगेत केल्या विसर्जित; सनातन रक्षक दलाचं कृत्य

Shivneri Bus: शिवनेरी बसमध्ये आता 'शिवनेरी सुंदरी'; हवाई सेवेच्या धर्तीवर भरत गोगावलेंची पहिलीच मोठी घोषणा

Sharad Pawar: सर्वात मोठी खेळी! शरद पवारांच्या पक्षात हा मोठा पक्ष होणार विलिन; हजारो कार्यकर्त्यांचा या दिवशी प्रवेश

Latest Maharashtra News Live Updates: राज ठाकरे ऑक्टोबरमध्ये संभाजीनगर, नाशिक अन् पुणे दौऱ्यावर

''या क्षणाला आम्हालाही खात्री नाही''; MS Dhoniच्या आयपीएल २०२५ खेळण्याबाबत CSK चं मोठं विधान; त्याला Uncapped...

SCROLL FOR NEXT