मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटील गेले असून अंधेरी पूर्व येथील पोटनिवडणुकीबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर मनसे भाजप आणि शिंदे गटाच्या युतीला पाठिंबा देणार का याकडे लक्ष असणार आहे. अंधेरी पोटनिवडणुकीत भाजपकडून मुरजी पटेल आणि ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे या निवडणुकीत दुरंगी लढत होणार आहे.
(Raj Thackeray And CM Eknath Shinde Meeting Latest Updates)
मुंबई महानगरपालिका निवडणुकीत मनसे स्वबळावर लढणार असून भाजपसोबत युती करणार नसल्याचं पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यानंतर आता अंधेरी पोटनिवडणुकीत मनसे कुणाला पाठिंबा देणार याकडे लक्ष लागलेले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर राज ठाकरे त्यांची भेट घेणार असून ते रवाना झाले आहेत.
दरम्यान, अंधेरी पोटनिवडणुकीसाठी भाजप आणि ठाकरे गटाने मोर्चेबांधणी केली असून एकमेकांविरूद्ध दंड थापटले आहेत. तर ऋतुजा लटके यांचा महानगरपालिका कर्मचारी पदाचा राजीनामा स्विकारला जात नसल्यामुळे त्यांच्या अडचणी वाढल्या होत्या. पण कोर्टात धाव घेतल्यानंतर त्यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला होता.
शिंदे गटाचा उमेदवार नाही
अंधेरीसाठी भाजपने मुरजी पटेल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मुरजी पटेलांनी भाजपने आधीच आश्वान दिलं होतं. तर मुरजी पटेल हे सुद्धा ही निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. त्यामुळे शिंदे भाजप युतीकडून शिंगे गटाचा उमेदवार न देता मुरजी पटेल यांना उमेदवारी दिली आहे.
पटेल यांच्या उमेदवारीवर ठाकरे गटाचा आक्षेप
बृहन्मुंबई महानगरपालिकेने मुरजी पटेल यांना ६ वर्ष निवडणूक लढण्यास अपात्र ठरविले असतानादेखील उमेदवारी अर्ज कसा काय स्विकारला असा सवाल ठाकरे गटाकडून उपस्थित करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.