ray nagar sakal
महाराष्ट्र बातम्या

शाळेची गोडी वाढविणारी ‘रे-नगर’मधील अंगणवाडी! ‘झेडपी’तर्फे सेसमधून पावणेसहा लाखांचा निधी; उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून कौतुक

रे-नगर प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील १५ हजार घरकुलांचे लोकार्पण १९ जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. त्याठिकाणी उभारलेली अंगणवाडी सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. दिव्यांग चिमुकल्यांसाठी रॅम्प तर इतरांसाठी स्वतंत्र पायऱ्या आणि भिंतींवर आकर्षक चित्रे काढली आहेत.

तात्या लांडगे

सोलापूर : रे-नगर प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील १५ हजार घरकुलांचे लोकार्पण १९ जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. त्याठिकाणी उभारलेली अंगणवाडी सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. समोर प्ले ग्राउंड तयार केले जात आहे, तत्पूर्वी दिव्यांग चिमुकल्यांसाठी रॅम्प तर इतरांसाठी स्वतंत्र पायऱ्यांची सोय आणि भिंतींवर आतून व बाहेरून आकर्षक चित्रे काढली आहेत. पुण्यातील जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही त्याचे कौतुक केले.

अंगणवाडी बांधकामासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून केवळ सव्वा अकरा लाखांचाच निधी मिळतो. त्या रकमेत अपेक्षित कामे होत नाहीत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी सेस फंडातून पाच लाख ७५ हजार रुपयांचा निधी दिला. त्यामुळे त्याठिकाणी सुंदर अशी अंगणवाडी उभारली गेली आहे. नवीन ठिकाणी राहायला येणाऱ्या चिमुकल्यांसाठी आनंदाची पर्वणीच असणार आहे. सोलापूर जिल्ह्यात एकूण चार हजार ७३० अंगणवाड्या असून, त्यात रे-नगरातील अंगणवाडी आदर्श ठरली आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत उभारलेल्या सोलापूर शहराजवळील रे-नगर परिसरात कामगारांसाठी ३० हजार घरे बांधून दिली जात आहेत. त्यातील १५ हजार घरे पूर्ण झाली आहेत. त्याठिकाणी ही अंगणवाडी आहे.

अंगणवाडी बांधकामाला मिळणार वाढीव निधी

जीएसटी, मजुरी, महागलेले बांधकाम साहित्य, यामुळे सध्या अंगणवाडी बांधकामासाठी शासनाकडून मिळणारा निधी अपुरा पडतो. त्यामुळे रे-नगरातील एका आदर्श अंगणवाडीसाठी जिल्हा परिषदेने पावणेसहा लाखांचा अतिरिक्त निधी उपलब्ध करून दिला. चिमुकल्यांना शाळेची गोडी वाढेल अशी अंगणवाडी साकारली आहे. या पार्श्वभूमीवर आता राज्यातील अंगणवाडी बांधकामासाठी १६ ते १७ लाख रुपये देण्यात येणार आहेत. त्यासंबंधीचा निर्णय आगामी अर्थसंकल्पात होऊ शकतो.

अंगणवाडीची वैशिष्ट्ये...

  • - ५०० पेक्षा अधिक स्क्वेअर फूट परिसरात उभारली अंगणवाडी

  • - एका बाजूने अंगणवाडीत जायला पायऱ्या तर दुसरीकडून दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी रॅम्पची सोय

  • - अंगणवाडीला वॉल कंपाउंड आणि विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी उभारले जाणार प्ले ग्राउंड

  • - अंगणवाडीच्या भिंतींवर आकर्षक चित्रे (रंगकाम) आणि अंगणवाडीच्या आतील भागातही रंगरंगोटी

चिमुकल्यांना शाळेची आवड निर्माण व्हावी

कामगार वस्तीतील चिमुकल्यांना शाळेची गोडी निर्माण व्हावी, शाळेतील गळती थांबावी, एकही विद्यार्थी शाळाबाह्य राहू नये, या हेतूने कुंभारी परिसरातील रे-नगर प्रकल्पाच्या ठिकाणी ४० मिनी अंगणवाड्या उभारल्या आहेत. अंगणवाडीत येणाऱ्या दिव्यांग मुलांसाठी जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून निधी देऊन एका ठिकाणी रॅम्प वॉक उभारला आहे. त्याठिकाणी अजून खेळाचे मैदान, वॉल कंपाउंड अशा सुविधा होतील.

- मनीषा आव्हाळे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT