राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी रविवारी (१२ फेब्रुवारी) धक्कादायक दावा केला. तुरुंगात एक अशी ऑफर आली होती, ती स्वीकारली असती, तर महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखालील एमव्हीए सरकार खूप आधीच पडले असते, असे ते म्हणाले.
अनिल देशमुख मनी लाँड्रिंग प्रकरणात १३ महिने तुरुंगात होते आणि आता जामिनावर बाहेर आहेत. अनिल देशमुख यांना नोव्हेंबर २०२१ मध्ये अटक करण्यात आली होती आणि गेल्या वर्षी २८ डिसेंबर रोजी त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली होती.
अनिल देशमुख यांनी वर्धा येथील सेवाग्राम येथे नदी व वन संवर्धन क्षेत्रात काम करणाऱ्याॉ एनजीओच्या सामूहिक वनहक्कांच्या राज्यस्तरीय अधिवेशनात दिलेल्या भाषणादरम्यान ते बोलत होते. येथे त्यांनी दावा केला की, मला तुरुंगात एक ऑफर आली होती, जी मी नाकारली. जर मी तडजोड केली असती (ऑफर स्वीकारली) तर महाविकास आघाडीचे सरकार अडीच वर्षांपूर्वी पडले असते, पण माझा न्यायावर विश्वास आहे. म्हणून मी तुरूंगातून बाहेर सुटका होण्याची वाट पाहत होतो.
तपास यंत्रणा पुरावे सादर करण्यात अपयशी
यापूर्वी शनिवारी (११ फेब्रुवारी) अनिल देशमुख म्हणाले की, माझ्यावर १०० कोटी रुपयांचा (मनी लाँड्रिंग) आरोप आहे, मात्र आरोपपत्रात ही रक्कम१.७१ कोटी रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे. ते म्हणाले, तपास यंत्रणा १.७१ कोटी रुपयांचे पुरावे देथीस सादर करण्यात अपयशी ठरली.
अनिल देशमुख यांनी दावा केला की, सीबीआय आणि अंमलबजावणी संचालनालयाने (ED) नोंदवलेल्या खटल्यांमध्ये काहीही तथ्य नसल्याचे उच्च न्यायालयाला आढळून आले. ते म्हणाले की, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनीही देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते, मात्र ते आरोपांच्या चौकशीसाठी स्थापन केलेल्या चांदीवाल आयोगासमोर हजर झाले नाहीत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.