Anil-Deshmukh 
महाराष्ट्र बातम्या

'दोन्ही अनिल शोधून त्यांचे मास्टरमाईंड गाठा'; देशमुखांच्या अटकेनंतर भाजपची प्रतिक्रिया

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना काल सोमवारी मध्यरात्री सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अटक केली आहे. जवळपास १४ तास चाललेल्या चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली. देशमुख यांना मंगळवारी सकाळी ११ वाजता न्यायालयात हजर केले जाणार आहे. (Anil Deshmukh money laundering case update) यावर आता भाजपने आनंद व्यक्त केला असून वसूली करणारे दोन अनिल कोण याची चौकशी व्हावी अटक केली जावी, अनिल देशमुख हे फक्त सुरूवात अजून यामागे कोण कोण आहेत याचा तपास करून अटक करावी, अशी मागणी केली आहे.

भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी म्हटलंय की, अखेर देशमुख यांना अटक झाली आहे. वसूली कांड प्रकरणातील ही पहिली अटक असली तरी ही प्याद्याची अटक आहे. अनिल देशमुख यांना गृहमंत्री कोणी केले? त्यांच्याबरोबर आणखी अनिल कोण होतं? आणि हे दोन्ही अनिल मिळून आपला वाटा कोणाला द्यायचे? याचा सुद्धा छडा लावण्याची गरज आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की, येणाऱ्या काळात ईडी आणि सीबीआय या केवळ दोन अनिलवर न थांबता त्यांचे जे मास्टरमाईंड्स आहेत, त्यांच्यापर्यंतही पोहोचतील आणि त्यांच्यापर्यंत पोहोचलेल्या पैशांचा शोध घेऊन भ्रष्टाचाराची ही किड जी महाभकास आघाडीने लावलीय, ती नष्ट करतील.

राम कदम यांनी म्हटलंय की, विशेषच्या विरोधातील नसून भ्रष्टाचाराच्या विरोधात आहे. कल्पना करा. महिन्याला एका खात्यात फक्त मुंबईतून 100 कोटी तर संपूर्ण महाराष्ट्रात किती? आणि सर्व खाती मोजली तर किती कोटी? हे सरकार आहे की नोटा छापण्याचा कारखाना? असा सवाल देखील त्यांनी केला आहे.

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी तत्कालीन गृहमंत्री देशमुख यांच्यावर शंभर कोटींच्या वसुलीचे आरोप केले होते. त्यावरून केंद्रीय तपास यंत्रणांनी अनिल देशमुख यांच्या विरोधात गुन्हे नोंदवून तपास सुरू केला आहे. या कारवाईने महाविकास आघाडी सरकारच्या पुढील अडचणी वाढल्या आहेत. आजपर्यंत ‘ईडी’ने चार वेळा देशमुख यांना समन्स पाठवले होते. मात्र त्यांनी वकिलांच्या मार्फत उत्तर देत कारवाईचा तपशिल मागितला होता.

‘ईडी’च्या संभाव्य कारवाईच्या विरोधात न्यायालयीन लढाईत अपयश आल्यानंतर देशमुख सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास ईडीच्या कार्यालयात पोहोचले. तब्बल १४ तास त्यांची कसून चौकशी करण्यात आली. अखेर रात्री एकच्या सुमारास त्यांना अटक करण्यात आली. देशमुख रात्रभर ईडी कार्यालयात असतील. मंगळवारी सकाळी त्यांना वैद्यकीय चाचणीसाठी रुग्णालयात नेले जाईल. यानंतर सकाळी अकराच्या सुमारास त्यांनी न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prakash Ambedkar: “सध्या धर्म नव्हे, आरक्षण संकटात”; ओबीसींनी वंचितसोबत राहण्याचं आंबेडकरांचं आवाहन

Rahul Gandhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही स्मृतिभ्रंशाचा आजार; आता ते आमचेच भाषण चोरत आहेत

Rajnath Singh : राहुल गांधी तुम्ही, आता जातगनणेची "ब्लु प्रिंट' जनतेसमोर आणाचं

ST Passengers : लालपरीच्या प्रवाशांत तीन वर्षांत ५० हजाराने वाढ; पुणे विभागाला आणखी १६० बसची आवश्यकता

Pakistan Army: पाकिस्तानच्या लष्करी तळावर दहशतवादी हल्ला! ७ सैनिक ठार, १५ जखमी

SCROLL FOR NEXT