राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल दशमुख हे कथित १०० कोटींच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी गेल्या वर्षभरापासून तुरूंगात होते, त्यांची आज सुटका झाली. या सुटकेनंतर राष्ट्रवादीचे नेते, कार्यकर्त्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केलं.
दरम्यान आज अनिल देशमुख १ वर्ष, १ महिना आणि २७ दिवसांनी अखेर तुरुंगाबाहेर आले आहेत. यानंतर सर्वत्र अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या आरोपांची चर्चा होते आहे. पण तुम्हाला माहिती आहे का की, अनिल देशमुख हे एकदा एका चित्रपचातील गाण्यामुळं आमदार बनले होते.
१९९५मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत अनिल देशमुख यांनी काटोल मतदारसंघातून अपक्ष निवडणुक लढवली आणि एका या 'गोरे गोरे मुखडेपे काला काला चश्मा' गाण्यामुळे ते आमदार होऊन विधानसभेत पोहोचले होते. हे प्रकरण नेमकं आहे काय? हेच आपण आज जाणून घेणार आहोत..
तब्बल २९ वर्षापूर्वी १९९४ मध्ये सुहाग हा चित्रपट प्रदर्शित झाला, या चित्रपटातील 'गोरे गोरे मुखडेपे काला काला चश्मा' हे गाणं भलत प्रसिध्द झालं. अक्षय कुमार आणि नगमा यांचं हे गाणं सगळीकडं वाजू लागलं.दरम्यान तेव्हा झालेल्या विधानसभा निवडणूकीत अनिल देशमुख यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला आणि त्यांना निवडणूक चिन्ह मिळालं ते काळा रंगाचा चष्मा. झालं, याचा अनिल देशमुख यांनी पुरेपुर फायदा घेतला.
हे गाणं त्यावेळी हे गाणं तरुणाने डोक्यावर घेतलं होतं. याचाच फायदा घेत अनिल देशमुख यांनी हे गाणं लाऊड स्पीकरवर वाजवून दणक्यात प्रचार केला. लोक हे गाणं ऐकायला गर्दी करत आणि तीच संधी साधून अनिल देशमुखांनी त्यांचा प्रचार केला. जेव्हा निवडणूकीचा निकाल हाती आला तेव्हा अपेक्षेप्रमाने आमदारकीची माळ अनिल देशमुख याच्या गळ्यात पडली. या एका गाण्यामुळे अनिल देशमुख आमदार झाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.