anil parab sakal media
महाराष्ट्र बातम्या

हिवाळी अधिवेशन मुंबईतच करण्यावर सत्ताधारी ठाम!

ओमकार वाबळे

परिवहन मंत्री अनिल परब यांनी राज्य सरकाच्या हिवाळी अधिवेशनासंदर्भात महत्वाची माहिती दिली आहे. येत्या डिसेंबर महिन्यात यंदाचं हिवाळी अधिवेशन पार पडणार आहे. ते नागपूरऐवजी मुंबईतच होणार असल्याची माहिती मिळते. येत्या 22, 23, 24, 27, 28 डिसेंबरला अधिवेशात कामकाज होईल. यंदाच्या अधिवेशनात 12 विधेयके मांडणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

२४ डिसेंबरला बिझनेस अॅडव्हायजरी कमिटीची मीटिंग होणार आहे. दरम्यान, सरकारच्या अधिवेशनासंदर्भात निर्णयांवर नाराज असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी बोलून दाखवलं. फक्त 5 दिवस अधिवेशन होणार असल्याने मी निराश असल्याचं परिवहन मंत्री म्हणाले.

सगळ्यांना संपावर स्वार व्हायचंय...

एसटी कर्मचाऱ्यांचं नेतृत्व कोण करतंय याच्याशी आम्हाला घेणे देणे नाही. आजकाल प्रत्येकाला एसटीच्या संपावर स्वार व्हायचंय, असं परब म्हणाले.

एसटीच्या संपाची जबाबदारी घेणाऱ्यांनी कामगारांच्या नुकसानाची पण जबाबदारी घ्यावी, असं परब म्हणाले. राज्य सरकारने समोरून येऊन भरघोस वाढ केली आहे. 41 टक्क्यांची पगारवाढ करण्यात आल्यानंतरही संप मागे घेतला जात नाही. राज्य सरकारने नेमलेल्या समितीसमोर विलीनीकरणाचा मुद्दा असल्याने आमच्या हातात काही नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. अफवा पसरवून आणि कामगारांची माथी भडकवून हा संप सुरू असल्याचा दावा परबांनी केला.

12 आठवडे हून जास्त संप चालवण्यावर काही नियम आहेत. त्यापेक्षा जास्त दिवस संप केल्यास कर्मचारी आणि ग्राहकांचं नुकसान होईल. कामगारांना पगार वेळेवर आणि वाढीव मिळावे याची जबाबदारी आमची असल्याचं मी याधाही स्पष्ट केलंय.

एसटीच्या संपामुळे सिनिअर सिटिझन्स शाळा, कॉलेजातील विद्यार्थी यांचं नुकसान होत आहे. शाळा महाविद्यालयं सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना एसटीजी गरज आहे. त्यांची अडवणूक कामगारांनी करू नये, असं आवाहन परिवहनमंत्री अनिल परब यांनी केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan East Assembly Election 2024 Result Live: कल्याण पूर्वमध्ये उद्धव ठाकरे गटाला धक्का; सुलभा गायकवाड यांचा दणदणीत विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: महाराष्ट्रानं मतदान केलंय की ईव्हीएम नं केलंय; आदित्य ठाकरेंचा सवाल

Arjuni-Morgaon Assembly Election Result 2024: अर्जुनी मोरगाव मतदारसंघात राजकुमार बडोले आघाडीवर

Santosh Bangar Won Kalmanuri Assembly Election 2024 Result : संतोष बांगर विजयी; डॉ. संतोष टारफे यांचा पराभव

Ulhasnagar Assembly Election 2024 Result Live: उल्हासनगरमध्ये पुन्हा भाजपाचीच सत्ता; कुमार आयलानी यांचा विजय, ओमी कलानींना धक्का

SCROLL FOR NEXT