Anil parab Sakal Media
महाराष्ट्र बातम्या

ST कर्मचारी संप : न्यायालयाच्या आदेशाचे पालन करू - अनिल परब

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे (ST Employee Strike) आंदोलन सुरू आहे. आंदोलन आणखीनच चिघळले असून ३० च्या वर एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यावरच आज न्यायालयात सुनावणी घेण्यात येणार आहे. न्यायालय जो आदेश देईल पालन करू, असे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) म्हणाले.

महामंडळ राज्य सरकारमध्ये विलीन केल्याशिवाय आम्ही कामावर हजर राहणार नाही, अशी भूमिका एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी घेतली आहे. याच विलनीकरणाबाबत सरकार कायदेशीर प्रक्रिया आज पूर्ण करेल. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्याचं न्यायालयाला सांगण्यात येईल. त्यानंतर न्यायालय आपला निर्णय देईल. न्यायालयाच्या आदेशानुसार ही एक समिती स्थापन करण्यात येईल. मुख्यसचिव, परिवहन सचिव, फायनान्स सेक्रेटरी यांच्या अधिपत्याखाली त्रिसदस्यीय समिती असेल. त्याचा जीआर काढण्यात येईल. विलनीकरण केल्यास सरकारच्या तिजोरीवर किती ताण पडेल याचा अभ्यास केला जाईल. विलीनीकरणाच्या एकूणच मागणीबाबत अभ्यास करून या समितीने आपला निर्णय सरकारला द्यायचा आहे, असं अनिल परब यांनी सांगितले. तसेच संप चिघळण्यापेक्षा त्यावर तोडगा काढण्याचे काम सरकार करत असल्याचे त्यांनी सांगितले.

एसटी संपाचा आजचा चौदावा दिवस आहे. राज्यातील अनेक बस डेपो बंद असून वाहतूक व्यवस्थेवर परिणाम झाला आहे. ऐन दिवाळीत हा संप पुकारल्याने प्रवाशांचे देखील हाल होत आहेत. अनेकांना बसची वाट पाहत ताटकळत उभे राहावे लागत आहे. मात्र, एसटी कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम असून संप सुरूच आहे. आज न्यायालय यावर काय आदेश देणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT