Sharad Pawar sakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar : विरोधकांच्या कारखान्यांबाबत दुजाभाव;शरद पवार यांनी वेधले मुख्यमंत्री शिंदेंचे लक्ष

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : विरोधी पक्षाच्या आमदारांना निधी मिळत नाही, ही ओरड सुरुच असताना आता विरोधी पक्षाच्या कारखान्यांना हमी न देण्याचे धोरण राज्य सरकारने अवलंबले आहे. या अनुषंगाने आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सह्याद्री अतिथिगृह येथे भेट घेऊन विरोधी पक्षाच्या नेते आणि आमदारांवर अन्याय होत असल्याकडे शिंदे यांचे लक्ष वेधले.

साखर कारखान्यांच्या कर्जाला थकहमी देण्याबाबत महायुती सरकारकडून दुजाभाव केला जात आहे. राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या हितासाठी या कारखान्यांना मदत करा. या प्रकरणात हस्तक्षेप करा, अशी मागणी पवार यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे या भेटीत केल्याचे व मुख्यमंत्र्यांनीही याबाबत सकारात्मकता दर्शवल्याचे समजते.

सहकार खाते अजित पवार गटाकडे असल्याने कुणाच्या कारखान्याचे थकहमीचे प्रस्ताव पाठवायचे यात हस्तक्षेप होत असल्याचा आरोप कारखानदार करत आहेत. राज्यातील ज्या १३ कारखान्यांच्या कर्जाला थकहमी दिली त्यात काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांच्या राजगड सहकारी साखर कारखान्याचा समावेश असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तसेच दुसरी यादी ‘एनसीडीसी’कडे पाठविणार आहे. या यादीत पुन्हा सत्ताधारी नेत्यांच्या कारखान्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे शरद पवार यांच्याकडे समर्थक आमदारांनी तक्रारी केल्या होत्या.

दूध दराबाबत पुनर्विचार करा

दूध उत्पादकांना जाहीर करण्यात आलेले अनुदान मिळालेले नाही. त्यामुळे त्याबाबत पुनर्विचार करावा, अशी मागणी पवार यांनी या भेटीत मुख्यमंत्र्यांकडे केली. दूध दरप्रश्नी उत्पादक शेतकरी संघर्ष समितीतर्फे संगमनेर येथून आंदोलनाला सुरुवात होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पवार यांच्या नेतृत्वाखाली समितीच्या शिष्टमंडळानेही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT