crime news india Naxals beat workers and destroyed 6 vehicles in Gadchiroli e sakal
महाराष्ट्र बातम्या

Naxal Attack: गडचिरोलीत मोठी कारवाई! भामरागड तालुक्यात तीन नक्षलवाद्यांचा खात्मा

यामध्ये एका कमांडरचाही समावेश असल्याची माहिती

Amit Ujagare (अमित उजागरे)

भामरागड : गडचिरोली जिल्ह्यात नक्षलविरोधी मोठी कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये सुरक्षा रक्षकांसोबत झालेल्या चकमकीत तीन नक्षलवादी ठार झाले आहेत. यामध्ये एक पुरुष कमांडर तर दोन महिला नक्षलींचा समावेश आहे. (big anti naxalite operation in Gadchiroli three naxalites killed in Bhamragarh taluka)

सुत्रांच्या माहितीनुसार, पेरीमी दलमचा कमांडर DVCM वासू याच्यासह अन्य दोन जण या चकमकीत ठार झाले आहेत. या दोन महिला नक्षलवादी असल्याची माहिती मिळतेय. या कारवाईत त्यांच्याकडून एके -४७, कारबाईन, इन्सास राफाईल्स ही अत्याधुनिक शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. Latest Marathi News

भामरागड तालुक्यीतल कत्रांगट्टा गावाजवळ काही नक्षलवादी जंगलात तळ ठोकून बसल्याची माहिती सुरक्षा रक्षकांना मिळाली होती. हे नक्षलवादी काहीतरी विघातक कृत्य करण्याच्या तयारीत असल्याचीही खबर होती. ही माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस अधीक्षक यातीश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली दोन पथकं घटनास्थळी रवाना करण्यात आली.

त्यानंतर या परिसरात शोध मोहिम राबवली जात असताना अचानक नक्षलवाद्यांनी गोळीबार केला, त्याला सुरक्षा रक्षकांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. यामध्ये नक्षलवाद्यांच्या एका कमांडरसह दोन महिला नक्षलवादी ठार झाले. Marathi Tajya Batmya

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात मतमोजणीला प्रत्यक्ष साडे आठ वाजता सुरुवात होणार

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निवडून आल्यानंतरही पक्षासोबतच राहू; ठाकरेंनी लिहून घेतलं प्रतिज्ञापत्र

Maharashtra Assemble Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT