Nine schools in Satara district will be model schools sakal
महाराष्ट्र बातम्या

३० नोव्हेंबरपर्यंत अर्ज करा! दिव्यांग विद्यार्थ्यांना केंद्राकडून मिळणार ९ हजार ते १४,६०० रुपयांची शिष्यवृत्ती, जाणून घ्या निकष...

केंद्र सरकारमार्फत इयत्ता नववी आणि दहावीच्या दिव्यांग विद्यार्थ्यांना ‘प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती’ जाहीर करण्यात आली आहे. या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून दिव्यांग विद्यार्थ्यांना ३० नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहेत.

तात्या लांडगे

सोलापूर : दिव्यांग विद्यार्थ्यांचे सक्षमीकरण करण्यासाठी केंद्र सरकारमार्फत राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलद्वारे इयत्ता नववी आणि दहावीच्या दिव्यांग विद्यार्थ्यांना ‘प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती’ जाहीर करण्यात आली आहे. या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून दिव्यांग विद्यार्थ्यांना ३० नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहेत.

राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलवरील (एनएसपी) सर्व योजनांसाठी लाभार्थ्यांचे बायोमेट्रिक प्रमाणीकरण करणे बंधनकारक आहे. या प्री-मॅट्रिक योजनेसाठी पात्र विद्यार्थ्यांनी दिलेल्या कालावधीत ऑनलाइन अर्ज भरावेत, असे आवाहन शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी केले आहे. प्रत्येक अनुदानित शाळांनी त्यांच्याकडील शिष्यवृत्ती योजनेसाठी पात्र दिव्यांग विद्यार्थ्यांना अर्ज करण्यास मदत करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. विद्यार्थी स्वतंत्रपणे देखील शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकणार आहेत. सर्वसामान्य कुटुंबातील दिव्यांग विद्यार्थ्यांनाही उच्च शिक्षण घेता यावे, आर्थिक अडचणींमुळे शिक्षणात खंड पडू नये या हेतूने ही योजना सुरु करण्यात आली आहे.

शिष्यवृत्तीसाठी पात्रतेचे निकष...

  • - अनुदानित शाळांतील इयत्ता नववी व दहावीचे विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात.

  • - शिष्यवृत्ती एका इयत्तेला एका शैक्षणिक वर्षासाठीच लागू राहणार आहे.

  • - विद्यार्थ्याचे दिव्यांगत्वाचे प्रमाण ४० टक्के किंवा त्याहून जास्त असावे.

  • - सक्षम अधिकाऱ्याचे दिव्यांगत्वाचे वैध प्रमाणपत्र कायद्यानुसार असावे.

  • - पालकांचे वार्षिक उत्पन्न दोन लाख ५० हजार रुपयांपेक्षा जास्त नसावे.

  • - पात्र दिव्यांग विद्यार्थ्यांना नऊ हजार ते १४ हजार ६०० रुपये इतकी शिष्यवृत्ती मिळते.

अर्ज करण्याच्या महत्वपूर्ण तारखा...

  • १) ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत : ३० नोव्हेंबर

  • २) शाळास्तरावरील अर्ज पडताळणी : १५ डिसेंबर

  • ३) जिल्हास्तरावर अर्ज पडताळणी : ३० डिसेंबर

अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट...

  • १) www.scholarships.gov.in

  • २) www.depwd.gov.in

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बाळासाहेबांची मोठी भूमिका, पंतप्रधानांचा थेट सदानंद सुळेंना फोन... सुप्रिया सुळेंनी सांगितला लग्नाचा 'तो' किस्सा!

Share Market Opening: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात मोठी घसरण; सेन्सेक्स- निफ्टी लाल रंगात

'राज्यात पुन्हा महायुतीचीच सत्ता येणार, ते कोणी माई का लालही रोखू शकणार नाही'; अजितदादांचा कोणाला इशारा?

Gold Price: ओमान, यूएई, कतार आणि सिंगापूरच्या तुलनेत भारतात सोन्याचे भाव कमी; काय आहे कारण?

Mumbai Traffic: मुंबईच्या रस्ते वाहतुकीत उद्यापासून बदल, जाणून घ्या महत्त्वाची बातमी

SCROLL FOR NEXT