caste validity and caste certificate esakal
महाराष्ट्र बातम्या

‘कास्ट व्हॅलिडीटी’साठी ‘या’ संकेतस्थळावर करा अर्ज, १५ दिवसांत प्रमाणपत्र! किती वर्षांपूर्वीचा पुरावा लागतो? 1 महिन्यात 2177 प्रमाणपत्रे वितरीत

व्यावसायिक कोर्सेससाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह परिपूर्ण प्रस्ताव https://barti.com किंवा ccvis या संकतस्थळावर ऑनलाइन अर्ज करावेत. त्यानंतर त्याची एक प्रत व प्रस्तावाची प्रत जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे सादर करावी.

तात्या लांडगे

सोलापूर : इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांची जेईई, सीईटी, नीट परीक्षा पार पडल्यानंतर आता प्रवेशाची लगबग सुरू झाली आहे. प्रवेशासाठी जात प्रमाणपत्राची पडताळणी (व्हॅलिडीटी) जरूरी असल्याने दररोज सरासरी दीडशे ते दोनशे प्रस्ताव जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे दाखल होत आहेत. समितीने जून महिन्यात तब्बल दोन हजार १७७ विद्यार्थ्यांना वैधता प्रमाणपत्र वितरीत केली आहेत.

व्यावसायिक शिक्षण, सेवापूर्व, सेवाअंतर्गत, निवडणूक अशा विविध कारणांसाठी जात प्रमाणपत्राची पडताळणी करून समिती संबंधितांना व्हॅलिडीटी प्रमाणपत्र देते. सध्या व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रस्ताव सर्वाधिक दाखल होत आहेत. व्हॅलिडीटीचा प्रस्ताव देत असताना त्यासाठी विशिष्ट कालावधीतील पुरावे व अन्य कागदपत्रांची गरज असते. पण, अनेक विद्यार्थ्यांनी अपूर्ण कागदपत्रांच्या आधारावर अर्ज केले आहेत. समितीने त्याची पडताळणी केल्यावर त्यातील पावणेसहाशे प्रस्तावांमध्ये त्रुटी आढळून आल्या आहेत. प्रत्येकजण कार्यालयात येवून त्रुटींची पूर्तता करणे अशक्य असल्याने त्या विद्यार्थ्यांच्या प्रस्तावांमधील त्रुटींची पूर्तता करण्याच्या निमित्ताने जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने आता विशेष कॅम्प आयोजित केला आहे. या कॅम्पच्या माध्यमातून संबंधित विद्यार्थ्यांना प्रस्तावातील त्रुटींच्या पूर्ततेची संधी मिळणार आहे.

कॅम्पमध्ये विद्यार्थ्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन

व्यावसायिक कोर्सेससाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह परिपूर्ण प्रस्ताव https://barti.com किंवा ccvis या संकतस्थळावर ऑनलाइन अर्ज करावेत. त्यानंतर त्याची एक प्रत व प्रस्तावाची प्रत जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे सादर करावी. प्रस्तावांची पडताळणी झाल्यावर संबंधित विद्यार्थ्यास काही दिवसात व्हॅलिडीटी मिळेल. कोणाच्याही अमिषाला बळी न पडता विद्यार्थ्यांनी थेट कार्यालयाशी संपर्क साधावा.

- सचिन कवले, सचिव, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, सोलापूर

व्हॅलिडीटीच्या पावणेसहाशे प्रस्तावात त्रुटी

जिल्हा जात पडताळणी समितीकडे दाखल केलेल्या एकूण प्रस्तावातील जवळपास ५७० प्रस्तावाच्या पडताळणीत त्रुटी आढळल्या आहेत. संबंधित विद्यार्थ्यांना समितीकडून मेसेज पाठविण्यात आले आहेत. त्यांनी आपल्या प्रवेशाला कोणतीही अडचण येवू नये, यासाठी ११ व १२ जुलैला जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या सात रस्ता परिसरातील कार्यालयात उपस्थित राहावे, असे आवाहन उपायुक्त बलभीम शिंदे यांनी केले आहे.

‘या’ वर्षांपूर्वीचे पुरावे जरूरी...

  • एससी : १९५० पूर्वीचा

  • व्हिजेएनटी : १९६१ पूर्वीचा

  • ओबीसी, एसबीसी, (एसईबीसी) : १९६७ पूर्वीचा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT