archana patil chakurkar daughter in law of shivraj patil join bjp devendra Fadnavis maharashtra Latur politics Lok Sabha Election 2024  
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Politics : काँग्रेसच्या माजी गृहमंत्र्यांची सून भाजपमध्ये, फडणवीसांनी २०१९च्या निवडणुकीत दिली होती तिकीटाची ऑफर...

Lok Sabha Election 2024 : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांची सून अर्चना पाटील चाकूरकर यांनी भाजप मध्ये प्रवेश केला आहे.

रोहित कणसे

Archana Patil Chakurkar Join BJP : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांची सून अर्चना पाटील चाकूरकर यांनी भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज त्यांनी मुंबईत भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे इत्यादी पक्षाचे नेते उपस्थित होते.

लोकसभा निवडणुका जवळ येत असताना राज्यात राजकीय हलचालींना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांच्या मध्यस्थीने काँग्रेसचे आणखी एक नेते भाजपमध्ये प्रवेश करू शकतात असे सांगितले जात होते. मराठवाड्यातील नेते अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर मराठवाड्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता असल्याची देखील चर्चा होती. त्यानंतर काल अर्चना पाटील चाकूरकर यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर आज हा पक्ष प्रवेश पार पडला आहे. काँग्रेसमधून नुकतेच भाजपमध्ये दाखल झालेले अशोक चव्हाण यांनी पक्षप्रवेशासाठी मध्यस्थी केल्याचे वृत्त आहे.

दरम्यान पाच वर्षांपूर्वीच डॉ. अर्चना चाकूरकर यांना भाजपमध्ये सामील होण्याची ऑफर देण्यात आली होती. मात्र काही कारणांनी त्यांनी ही ऑफर नाकारली होती. अर्चना पाटील भाजपमध्ये सहभागी झाल्याने महाराष्ट्र काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. यापूर्वी अनेक बड्या काँग्रेस नेत्यांनी पक्षाला रामराम केला आहे.

महाराष्ट्रातील दिग्गज नेते आणि दोनदा मुख्यमंत्री राहिलेले अशोक चव्हाण फेब्रुवारी २०२४ मध्ये पक्षातून बाहेर पडले, त्यांनी नंतर भाजपमध्ये प्रवेश केला. माजी खासदार मिलिंद देवरा यांनी देखील काँग्रेस पक्षासोबतचं आपलं नातं संपवून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. यासोबतच बाबा सिद्दीकी यांनी देखील ८ फेब्रुवारी रोजी काँग्रेस सोडून अजित पवारांच्या राष्ट्रवादीची वाट धरली. त्यामुळ काँग्रेस पक्षाला मागील काही दिवसात मोठे धक्के सहन करावे लागले आहेत. याचा मोठा फटका काँग्रेसला आगामी लोकसभा निवडणूकीत पाहायला मिळू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Municipal Elections: मुंबईत शिवसेनेला उभारी मिळणार? महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकणार...

Unsold Player List IPL 2025 Auction: पृथ्वी, शार्दूल ते वॉर्नर यांच्यासह ११० खेळाडू राहिले अनसोल्ड, वाचा संपूर्ण लिस्ट

IPL 2025 Mega Auction: लिलाव संपला! १८२ खेळाडूंसाठी फ्रँचायझींनी खर्च केले ६३९.१५ कोटी रुपये; पाहा खरेदी केलेल्या खेळाडूंची यादी

MLA Rohit Pawar : आपले उद्योग गुजरातला, तेथील ईव्हीएम महाराष्ट्रात

हैतीमध्ये अराजकता! टोळीयुद्धात शेकडो जणांचा मृत्यू, अल्पवयीन मुलांची टोळ्यांमध्ये भरती

SCROLL FOR NEXT