क्रूझ ड्रग पार्टी प्रकरणात एनसीबीने (NCB) केलेल्या कारवाईमध्ये आर्यन खानला (Aryan Khan) ताब्यात घेण्यात आलं होतं. त्यानंतर राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केलेल्या आरोपांनंतर या प्रकरणाला एक नवं वळण मिळालं आहे. एनसीबीने समीर वानखेडे यांच्याकडून आर्यन खानसह ६ प्रकरणांचा तपास काढून घेतला होता. त्यातच ज्या नव्या पथकाकडे तपास सोपवण्यात आला आहे, त्या पथकाने आज आर्यन खानला चौकशीसाठी समन्स पाठवण्यात आलं आहे. त्यानुसार आज आर्यनला आज एनसीबी कार्यालयात चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं.
एनसीबीच्या विशेष तपास पथकाने आर्यन खानला समन्स बजावलं होतं. या प्रकरणातील चौकशीसाठी आर्यनला आज एनसीबी कार्यलयात बोलावलं होतं. मात्र प्रकृती ठिक नसल्याने आर्यन खान आज चौकशीसाठी उपस्थित राहणार नसल्याचं समजतं आहे. आर्यन खानला आज ताप आली असल्याने तो आज चौकशीसाठी उपस्थित राहू शकत नाही, त्यामुळे तो उद्या एनसीबी कार्यालयात जाणार असल्याची शक्यता आहे.
समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर झालेल्या गंभीर आरोपांनंतर समीर वानखेडे यांच्याकडे असलेल्या ६ प्रकरणांचा तपास समीर वानखेडे यांच्याकडून काढून घेण्यात आला होता. आपणच ही मागणी केली असून, या प्रकरणाचा तपास एनसीबीच्या दिल्लीच्या पथकाकडे सोपवण्यात आल्याचं समीर वानखेडेंकडून सांगण्यात आलं होतं. एनसीबीच्या विशेष तपास पथकाने (SIT) आता सर्व ६ प्रकरणातील आरोपींना समन्स बजावले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.