औरंगाबाद : महाराष्ट्रात सद्या जे वातावरण सुरू आहे. या वातावरणात एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी हे सहभागी होतील, असे जयंत पाटील म्हणाले होते. असदुद्दीन ओवैसी व राज ठाकरेंची ही मिलीभगत असल्याचे ते म्हणाले होते. याला उत्तर देताना ओवैसी (Asaduddin Owaisi) म्हणाले, ते हे कसे म्हणाले मला माहिती नाही. मात्र, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपमध्ये कधी जाणार हे सांगावे, असा टोला त्यांनी लगावला.
कोणाच्या घरासमोर हनुमान चालिसा वाचने चुकीचे आहे. आम्ही भाजप नेत्याच्या घरासमोर कुराण वाचतो असे म्हटले तर बरोबर होणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरासमोर जाऊन कुराण वाचली तर काय होईल. जे मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन करणार होते ते माझे मित्र नाही आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सुद्धा माझे मित्र नाही. महाराष्ट्रात सद्या दोन भावांचे भांडण सुरू आहे. महाराष्ट्रातील वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) म्हणाले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांची रविवारी (ता. १) औरंगाबादमध्ये सभा होऊ घातली आहे. त्यांच्या सभेला जाणून बुजून परवानगी दिली गेली आहे. परवानगी दिल्यावर शांतता राखण्याची जबाबदारी पाळायला हवी, असेही असदुद्दीन ओवैसी म्हणाले. उद्या नांदेडमध्ये ओवैसी यांची सभा होणार आहे. त्याच्या आदल्यादिवशी ते पत्रकारांशी बोलत होते.
आपल्या घरातील राग माझ्यावर काढतात
राज ठाकरे (raj thackeray) हे हिंदू ओवैसी असल्याचे काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले होते. याला उत्तर देताना ओवैसी म्हणाले. माझ्या वडिलांचे नाव ओवैसी आहे. माझ्या आजोबांचे नाव ओवैसी आहे. त्यामुळे संजय राऊत असे का म्हणाले हे मला माहिती नाही. हा वाद त्यांच्या घरचा आहे. राऊत त्यांच्या घराचे सदस्य आहे. संजय राऊत (Sanjay Raut) आपल्या नेत्यांचा राग माझ्यावर काढतात. त्यांच्या सपणात मी येतो तर यात माझी काय चूक आहे, असेही ओवैसी (Asaduddin Owaisi) म्हणाले.
एमआयएम कोणत्याही पक्षाची ‘बी’ टीम नाही
काही वर्षांपूर्वी त्यांनी नरेंद्र मोदींना मतदान करण्याचे आवाहन केले होते. मोदींसाठी मत मागितले होते. काही एक दिवसासाठी राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपने लग्न केले होते. हनिमुनला गेले होते. तेव्हा त्यांना काय म्हणाले. उलट माझ्यावर आरोप केले जात आहे. पक्षाबद्दल बोलले जात आहे. आम्ही शिवसेनेला हरवले. म्हणून आमच्यावर ‘बी’ टीम असल्याचा आरोप केला जात आहे. एमआयएम कोणत्याही पक्षाची ‘बी’ टीम नाही, असेही असदुद्दीन ओवैसी म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.