AR Antule Vitthal Pooja Eknath Shinde Ashadhi Ekadashi Sakal
महाराष्ट्र बातम्या

Ashadhi Ekadashi 2024: अंतुले मुख्यमंत्री असताना शासकीय महापूजा मुस्लीम व्यक्तीच्या हस्ते झाली? काय आहे किस्सा?

Chief minister Pandharpur Mahapuja: १९७३ पासून विठ्ठलाची शासकीय पूजा करण्याचा मान मुख्यमंत्र्यांना दिला जातो. यापूर्वीच्या कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी विठ्ठलाची शासकीय महापूजेचा मान चुकवलेला नाही.

वैष्णवी कारंजकर

आषाढी एकादशी उद्या राज्यभरात साजरी होत आहे. आळंदीहून पायी चालत निघालेल्या वारकऱ्यांच्या दमलेल्या, थकलेल्या डोळ्यांना आता विठूमाऊलीच्य़ा दर्शनाची आस आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी वारकरी आणि विठूरायाचं मिलन घडून येणार आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी विठ्ठलाची महापूजाही केली जाते.

महाराष्ट्राच्या परंपरेनुसार, विठ्ठलाची शासकीय महापूजा राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडते. १९७३ पासून विठ्ठलाची शासकीय पूजा करण्याचा मान मुख्यमंत्र्यांना दिला जातो. यापूर्वीच्या कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी विठ्ठलाची शासकीय महापूजेचा मान चुकवलेला नाही. पण जेव्हा बॅरिस्टर अंतुलेंच्या रुपात राज्याला मुस्लीम मुख्यमंत्री मिळाला, तेव्हा काय झालं? विठ्ठलाची महापूजा मुस्लीम समाजातल्या व्यक्तीच्या हस्ते झाली का, त्याबद्दलचा एक किस्सा आज आपण जाणून घेणार आहोत.

शासकीय महापूजेचा इतिहास काय सांगतो?

आषाढी एकादशीची पूजा करण्याच्या परंपरेबद्दल काही इतिहासकारांमध्ये दुमत आढळून येतं. काही जण छत्रपती शिवाजी महाराजांचे दाखले देतात, तर काही जण पंढरपूर आदिलशाहीत असल्याचा संदर्भ देतात. मात्र पुढच्या काळामध्ये बाजीराव पेशव्यांनी विठ्ठल देवस्थान समिती स्थापल्यावर त्या समितीकडूनच पूजा केली जाऊ लागली. काही ठिकाणी साताऱ्याच्या गादीला पूजेचा मान मिळाल्याचे उल्लेखही आढळतात.

पुढे ब्रिटीश आले, महाराष्ट्रासाठीचा लढा झाला आणि संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली. त्यावेळचे महसूलमंत्री राजारामबापू यांच्या हस्ते विठ्ठलपूजा करण्यात आली. त्यावेळी म्हणजे साधारण १९७० सालाच्या आसपास काही लोकांनी सरकारने अशा प्रकारे पूजा अर्चा करणं योग्य नाही,असं म्हणत पूजेला विरोध केला आणि त्याविरोधात आंदोलनही पुकारलं. त्यामुळे १९७१ साली मंत्र्यांच्याहस्ते पूजा झाली नाही.

याच्या पुढच्याच वर्षी राज्यामध्ये मोठा दुष्काळ पडला. तेव्हा तत्कालिन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्याकडे लोकांकडून पूजा पुन्हा सुरू करण्याची विनंती करण्यात आली. विठ्ठलाची पूजा बंद झाल्यानेच दुष्काळ पडल्याचा त्यावेळी समज झाला होता. त्यानंतर १९७३ साली महाराष्ट्र शासनाने पंढरपूरचं हे विठ्ठल मंदीर आपल्या ताब्यात घेतलं आणि त्यानंतर या मंदिरासाठी विशेष कायदा मंजूर करण्यात आला. त्या कायद्यानुसार मंदिराचं कामकाज चालू लागलं आणि १९७३ मध्ये विठ्ठलपूजा करण्याचा मान मुख्यमंत्र्यांकडे आला.

यापूर्वीच्या मुख्यमंत्र्यांनी काय केलं?

वसंतदादा पाटील हे मुख्यमंत्री असताना त्यांनी वारकऱ्यांच्या मागणीवरून पंढरपूरसोबत देहू आणि आळंदीचा यात्रा कर रद्द केला. देवधर्मांचं अवडंबर न करणाऱ्या शरद पवार यांनीही आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या काळामध्ये शासकीय पूजा चुकवली नाही.

अंतुलेंच्या वेळी काय झालं?

बॅरिस्टर अंतुले हे मुस्लीम समाजातले होते. त्याच्या रुपाने राज्याला मुस्लीम मुख्यमंत्री मिळाला होता. पण मुस्लीम समाजातल्या व्यक्तीकडून विठ्ठलाची महापूजा कशी करायची? हा प्रश्न त्यावेळी निर्माण झाला होता. तेव्हा अंतुले यांच्या ऐवजी त्या काळचे महसूलमंत्री रजनी पाटील यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा पार पडली.

यानंतर पुढे राज्यामध्ये युतीचं सरकार आलं.मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले आणि विठ्ठलपूजेच्या सोहळ्यात थोडे बदल झाले. आषाढीची पूजा मुख्यमंत्र्यांनी करायची आणि कार्तिकी एकादशीची पूजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करायची, ही पद्धत याच काळातली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: निकालाची धडकी? उद्धव ठाकरेंचा प्लॅन बी! 'लाईव्ह'चं शस्त्र उगारलं, पुन्हा दगा टाळण्यासाठी उमेदवारांना एकत्र आणलं

Chh. Sambhajihnagar Election Reslut : घसरलेला टक्का कुणाच्या पथ्यावर? तिरंगी लढतीत बाजी कोण मारणार, याची उत्सुकता

Virat Kohli च्या रनमशीनला ब्रेक! १७ वर्षात सर्वाधिक कमी सरासरीची नोंद, पाहा प्रत्येक वर्षाचा बॅटिंग अ‍ॅव्हरेज

Nashik Vidhan Sabha Vote Counting: देवळालीचा निकाल सर्वप्रथम, नाशिक पश्‍चिम सर्वांत उशिरा; जिल्ह्यात उद्या मतमोजणी

Latur Assembly Election 2024 : अठरा हजार कोटी निधी आणल्याचा दावा, पण विकास दिसला का?

SCROLL FOR NEXT