Ashadhi wari 2023 sakal
महाराष्ट्र बातम्या

Ashadhi wari 2023 : पाऊले डिजिटली चालती पंढरीची वाट ! ऍप देणार पंढरीच्या वारीची अनुभूती

आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशीला लाखो भाविक शेकडो मैल पायी चालत भक्तिभावाने पंढपूरच्या दिशेने मार्गस्थ होत असतात.

सकाळ वृत्तसेवा

Ashadhi wari 2023: आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशीला लाखो भाविक शेकडो मैल पायी चालत भक्तिभावाने पंढपूरच्या दिशेने मार्गस्थ होत असतात. मात्र आज डीजीटायझेशनच्या युगात ऍपच्या माध्यमातून आपल्या शहरात, घरात आणि परिसरात फिरून तुम्ही पारंपरिक वारीचा अनुभव घेऊ शकता.

'YouTooCanRun' आणि 'पंचम निषाद' यांनी एकत्रित येत 'वॉक विथ वारी' आणि 'बोलावा विठ्ठल' या एकत्रित उपक्रमाचे आयोजन केले आहे. यंदाचे या व्हर्च्युअल वारीचे दुसरे वर्ष आहे.

अनेक स्त्रियांना इच्छा असते वारीत सहभागी होण्याची मात्र ते शक्य होत नाही. मात्र या ऍपमुळे मानसिकदृष्टया सहभागी होणं शक्य झाले आहे. यामध्ये तुम्हाला प्रत्येक टप्प्याची माहिती दिली जाते.

ते पारंपरिक सोहळे आणि गीते यांची अनुभूती या ऍपच्या माध्यमातून मिळेल, असा विश्वास वर्ल्ड रेकॉर्ड मॅरेथॉन रनर क्रांती साळवी आणि कामेश्वरी कुलकर्णी यांनी व्यक्त केला. या वारीचा समारोप दिवस म्हणजेच आषाढी एकादशी दिवशी 'बोलावा विठ्ठल'या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. (Latest Marathi News)

पद्मजा फेणाणी-जोगळेकर, देवकी पंडित, जयतीर्थ मेवुंडी आणि आनंद भाटे यांच्यासारख्या दिग्गज गायकांच्या सादरीकरणाने आषाढी एकादशीची संध्याकाळ श्रोत्यांना मंत्रमुग्ध करेल.

महाराष्ट्र आणि कर्नाटकातील संतांनी रचलेल्या बाराव्या शतकातील अभंग, भक्तीमय काव्यरचनांचे सादरीकरणाने आणि भावगीतांवर आधारित अविस्मरणीय मैफल षण्मुखानंद चंद्रशेखरेंद्र सरस्वती सभागृहात गुरुवार, २९ जून रोजी संध्याकाळी ५:30 वाजता सुरू होईल, अशी माहिती पंचम निषादने दिली.

पंचम निषादने रु. ३५०/- च्या पुढे असणाऱ्या प्रत्येक तिकीट खरेदीवर ‘वॉक विथ वारी’ मोफत नोंदणीची घोषणा केली आहे. अधिक माहितीसाठी ७०४५५९७५०५ वर व्हॉटस्अॅप करू शकता.

तर केवळ वॉक विथ वारीसाठी १०१ रुपये देऊन तुम्ही सहभागी होऊ शकता.अधिक माहिती आणि नोंदणीसाठी https://walkwithwari.com/ या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

दरवर्षीप्रमाणेच 'बोलावा विठ्ठल' या अभंगवाणीतुन तरुणांना आपल्या समृद्ध संस्कृती आणि पारंपरिक मूल्यांच्या जवळ आणण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील आहे. 'वॉक द वारी' मध्ये भक्ती आणि तंदुरुस्तीचा दुहेरी मार्ग दाखवताना आम्हाला आनंद होत आहे.

- शशी व्यास,संचालक, पंचम निषाद

व्हर्च्युअल वारीचे हे आमचे दुसरे वर्ष आहे. यंदाच्या वर्षी अडीच हजारांहून अधिक लोकांनी सहभाग नोंदवला आहे. या आभासी वारीच्या माध्यमातून आम्ही पारंपरिक वारीचा तंत्रज्ञानाशी मेळ घातला. ज्यातून नागरिकांना अध्यात्मासह तंदुरुस्त राहण्यासाठी आणि चालण्यासाठी आम्ही प्रोत्साहन देत आहोत.

- पी. वेंकटरामन, संचालक, यु टू कॅन रन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Election: विधानसभा निवडणुकीत दुबईत आला पैसा, क्रिप्टोकरन्सीद्वारे बेकायदा फंडिंग; भाजपचा मविआवर खळबळजनक आरोप

Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्र नोंदवेल का ६५ टक्के मतदान? दहा वर्षांपासून ६० टक्केच नोंद

Women’s Asian Champions Trophy: भारतीय संघाची पाचव्यांदा फायनलमध्ये धडक; जपानला सेमीफायनलमध्ये केलं पराभूत

Hitendra Thakur: एका मताच्या जोरावर विलासराव देशमुखांचं सरकार तारणारे हितेंद्र ठाकूर; बदल्यात काय घेतलं होतं?

Anil Deshmukh : तुम्ही दगड मारा किंवा गोळ्या झाडा, अनिल देशमुख मरणार नाही, आणि तुम्हाला सोडणारही नाही

SCROLL FOR NEXT