मुंबई : शहरातील खड्ड्यांची (mumbai potholes) दाहकता दाखविण्यासाठी एका तरुणानं खड्ड्यांची रांगोळी काढली आहे. मात्र, त्याच्यावर शिवसेनेकडून हल्ला होण्याची भीती आहे. कारण, मुंबईतील खड्ड्यांवर गाणं म्हणणाऱ्या रेडीओ जॉकीवर यांनी हल्ला केला होता. आता या रांगोळी काढणाऱ्या तरुणावर हल्ला केला तर खबरदार, असा दम भाजप आमदार आशिष शेलार (MLA Ashish Shelar) यांनी शिवसेनेला दिला आहे. तसेच त्यांनी खासदार सुप्रिया सुळे (MP supriya sule) यांच्यावर देखील निशाणा साधला आहे.
गेल्या 24 वर्षांत 21हजार कोटी खड्ड्यात घातले. तरी मुंबईतील रस्त्यांचे "रस्ते" लागले. आता धावते दौरे करुन कारवाईचा आरडाओरड करुन काय सांगयताय? तेच कंत्राटदार, त्याच निविदा आणि तिच थूकपट्टी. खड्ड्यांनी शिवसेनेचं पितळ उघड केलं आहे. महापौरांची धावपळ नाहीतर पळता भुई थोडी झाली आहे. महापौरांनी गणपतीच्या आधी मुंबईतील खड्ड्यांची पाहणी करून ते दुरुस्त करणे गरजेचे होते. मात्र, आता निवडणुकीच्या तोंडावर आम्ही काम केले हे दाखविण्यासाठी खड्डे पाहणी आणि दुरुस्ती सुरू आहे. त्यामधून पैसे खाण्याचा प्रकार सुरू आहे, असाही आरोप त्यांनी केला.
सुप्रिया सुळेंचं 'खड्डे विथ सेल्फी' कुठं गेलंय?
केवळ मुंबईतच नाहीतर राज्यभरात खड्ड्यांचा प्रश्न आहे. मुख्यमंत्र्यांनी खड्डे बुजविण्यासाठी दिलेल्या कंत्राटदारांची आणि एजन्सीची बैठक घेणे गरजेचे होते. कंत्राटदारांवर कारवाई करणे गरजेचे आहे. मात्र, त्यांनी तसं केलं नाही. सुप्रिया सुळे यांनी गेल्या सरकारमध्ये 'खड्डे विथ सेल्फी' आंदोलन केलं होतं. पण, तो फक्त दिखाऊपणा होता. आता सुप्रिया सुळे आणि त्यांचा 'खड्डे विथ सेल्फी' कार्यक्रम कुठे गेला? असा सवालही आशिष शेलार यांनी उपस्थित केला.
दरम्यान, शाळा सुरू करण्याच्या निर्णयावरून देखील त्यांनी राज्य सरकारवर टीका केली. यामागे राज्य सरकारची काय वैज्ञानिक भूमिका आहे, त्याचं आकलन आम्हाला होत नाही. लसीकरण उपलब्ध असलेल्या १८ वर्षांवरील तरुणांचे महाविद्यालये बंद आहेत. मात्र, लस उपलब्ध नाही, अशा विद्यार्थ्यांच्या शाळा सुरू केल्या जात आहेत, असेही शेलार म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.